किया इंडियाने आपली नुकतीच बोल्ड लुकवाली Kia Syros लाँच केली होती. ही कार कियाने भारत एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट करण्यासाठी दिली होती. या कारला धक्कादायक रेटिंग मिळाले आहे. या कारने टाटा, महिंद्रा, फोक्सवॅगनच्या रांगेत आपलाही नंबर लावला आहे.
किया सायरॉसने BNCAP मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळविले आहे. किया सेल्टॉसला ग्लोबल एनकॅपमध्ये अडल्टसाठी थ्री स्टार आणि चाईल्डसाठी टू स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते. यानंतर कियाने ईव्ही ६ ला युरो एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळविले होते. आता भारत एनकॅपमध्ये कियाने सायरॉसला फाईव्ह स्टार रेटिंग मिळवत मैलाचा दगड पार केला आहे.
कियाच्या देखील ताफ्यात आता फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगच्या कारची एन्ट्री झाली आहे. कियाला प्रौढ प्रवाशांच्या संरक्षणात (AOP) 32 पैकी 30.21 गुण आणि लहान मुलांच्या संरक्षणात (COP) 49 पैकी 44.42 गुण मिळाले. सायरोस ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत मोडते.
कियाला समोरून धडकण्याच्या टेस्टमध्ये १६ पैकी १४.२१ गुण मिळाले. चालक आणि सहचालक दोघांचेही डोके, मान आणि पायाला चांगले संरक्षण मिळाले. सायरोसने साईड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये १६ पैकी पूर्ण १६ गुण मिळवले. १८ महिन्यांच्या डेमो मुलासाठी, फ्रंटल इम्पॅक्टमध्ये ८ पैकी ७.५८ आणि साइड इम्पॅक्टमध्ये ४ पैकी ४ गुण मिळाले.
सायरॉसमध्ये वेगळे काय...६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), वाहन स्थिरता व्यवस्थापन (VSM), ISOFIX चाइल्ड सीट अँकर पॉइंट्स, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीटबेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडरसह लेव्हल-२ ADAS फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत.