शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

लवकर लाँच होणार Kia Sonet Facelift; जाणून घ्या 'या' कारमध्ये काय फीचर्स असतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 15:31 IST

याव्यतिरिक्त, नवीन 16-इंच अलॉय व्हील देखील नवीन डिझाइनसह दिसतील. मात्र, कारच्या मागील बाजूस स्टाइलिंगमध्ये फारसा बदल होणार नाही.

नवी दिल्ली :  किआ (Kia) लवकरच काही कॉस्मिक बदलांसह आपले सोनेट फेसलिफ्ट लाँच करणार आहे. ज्यामध्ये अपडेटेड ग्रिल डिझाइन आणि नवीन हेडलॅम्प सेट-अपमुळे सोनेटला नवीन लुकसह बदललेला फ्रंट एंड मिळेल. फ्रंट बंपर देखील नवीन लुकसह अपडेट करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, नवीन 16-इंच अलॉय व्हील देखील नवीन डिझाइनसह दिसतील. मात्र, कारच्या मागील बाजूस स्टाइलिंगमध्ये फारसा बदल होणार नाही.

नवीन किआमध्ये काही नवीन कलर देखील समाविष्ट केले जाऊ शकतात. तसेच, केबिनमधील ड्युअल टोन अपहोल्स्ट्रीसह नवीन इंटिरिअर कलरसोबत बदलला जाईल. डिझाईननुसार, सेंटर कन्सोलला वेगळ्या क्लायमेट कंट्रोल स्क्रीनसह नवीन रूप मिळते. तसेच, टॉगल स्विचसह बटणाचा लेआउट बदलला आहे. मात्र, त्याचे मूळ डिझाइन लेआउट समान राहते. इतर गोष्टींबरोबरच, स्टीयरिंग व्हीलवर आढळलेल्या नियंत्रणांच्या डिझाइनमध्ये बदल देखील पाहिले जाऊ शकतात.

याचबरोबर, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्येही बदल दिसून येतील आणि ते व्हेन्यू फेसलिफ्ट सारखे डिजिटल युनिट असणार आहे. पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, सोनेट सध्याच्या 1.2 पेट्रोल आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 डिझेल इंजिनसह ठेवली जाईल. दरम्यान, iMT क्लचलेस मॅन्युअल आहे, तसाच ठेवला जाण्याची शक्यता आहे. तर टर्बो पेट्रोल पॅडल शिफ्टर्ससह डीसीटी स्वयंचलित देखील उपलब्ध असतील. डिझेलमध्येही iMT पूर्वीप्रमाणेच कायम राहील.

कोणाला देणार टक्कर?या सेगमेंटमध्ये नवीन टाटा नेक्सॉन आणि नवीन ह्युंदाई व्हेन्यू लाँच करण्यात आली आहे, ज्या दोन्ही लोकप्रिय SUV आहेत. याला टक्कर देण्यासाठी सोनेटमध्ये काही बदल केले जाणार आहेत. नवीन किआ सोनेट फेसलिफ्ट पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच होईल अशी शक्यता आहे. तसेच, कारमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांमुळे किमतीत थोडी वाढ होऊ शकते.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारKia Sorento Suvकिया सोरेंटो एसयूवीKia Motars Carsकिया मोटर्स