शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

Kia India ची अफलातून ऑफर; कार आवडली नाही तर 30 दिवसांत परत करा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 18:11 IST

Kia Carnival MPV offer: किया इंडिया कंपनीने सॅटिस्फॅक्शन गॅरंटी स्कीम जाहीर केली आहे. कोणत्याही कारणाने तुम्ही कार परत करू इच्छित असाल तर ती परत करू शकता.

Kia India ने आज एक नवीन स्कीम सुरु केली आहे. याला कंपनीने सॅटिस्फॅक्शन गॅरंटी स्कीमनुसार जर कोणताही ग्राहक कियाची लक्झरी Carnival MPV खरेदी करत असेल तर त्यांना जबरदस्त ऑफर मिळणार आहे. कार पसंतीस उतरली नाही तर ३० दिवसांत कंपनीला परत करता येणार आहे. (Kia Carnival offered with 30 day return scheme)

सॅटिस्फॅक्शन गॅरंटी स्कीमनुसार जर तुम्ही कियाची लक्झरी कार किया कार्निव्हल खरेदी केली आणि जर तुम्हाला ही कार आवडली नाही किंवा कोणत्याही कारणाने तुम्ही ही कार परत करू इच्छित असाल तर ती परत करू शकता. यासाठी कंपनी तुम्हाला 30 दिवसांचा कालावधी देणार आहे. या ऑफरमध्ये एक अट आहे, ती म्हणजे ही एमपीव्ही खरेदी केल्यानंतर ती जर परत केली तर तिची 95 टक्के एक्स शोरुम किंमत तुम्हाला परत मिळणार आहे. याचसोबत रजिस्ट्रेशन आणि फायनान्सलसाठी आलेला खर्चही परत दिला जाणार आहे. या 30 दिवसांत कार 1500 किमी पेक्षा जास्त चाललेली असता नये. 

Kia SUV Fire: पार्किंगमध्ये उभ्या KIA च्या कारना आग लागण्याचा धोका; 4.4 लाख कार रिकॉल केल्या

Carnival MPV मध्ये व्हीआयपी सीट्स विथ एन्टरटेन्मेंट, वन टच पॉवर स्लायडिंग डोअर, पॉवर टेलगेट अशी भन्नाट फिचर्स आहेत. यामध्ये 27 स्मार्ट कनेक्टेड फिचर्स असून ही एमपीव्ही 3 व्हेरिअंटमध्ये येते. Kia Carnival मध्ये 202 लीटरचे डिझेल 4 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 198 एचपी ताकद आणि 440 एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. आणखी एक भन्नाट फिचर म्हणजे या कारमध्ये लॅपटॉप किंवा तत्सम उपकरणही चार्ज करता येणार आहे. कार्निव्हलची किंमत 24. 95 लाखांपासून सुरू होत असून 7, 8 आणि 9 सीटर अशीही ही एमयुव्ही मिळणार आहे. सर्वात महाग मॉडेल लिमोझिनची किंमत 33.95 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्स