शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ना चार्जिंगची काळजी, ना पार्किंगची चिंता; 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर हातात घेऊनही फिरू शकता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 16:48 IST

ह्युंदाई एक खास इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आली आहे.

नवी दिल्लीः ह्युंदाई एक खास इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आली आहे. ह्युंदाईची ही स्कूटर इतर स्कूटरांच्या तुलनेत जरा हटकेच आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ह्युंदाईनं 2017मध्ये प्रदर्शनासाठी ठेवली होती. कंपनीनं ही स्कूटर कार खरेदी करणाऱ्यांना सवलत देण्याच्या उद्देशानं लाँच केली आहे. या खास इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्रंट आणि रिअर लाइट्स, लिथियम आयन बॅटरी देण्यात आली असून, व्हील ड्राइव्ह सारख्या सुविधांनीही ती सुसज्ज आहे.कंपनीच्या म्हणण्यानुसार, भविष्यात ह्युंदाई आणि किओ मोटार्सच्या गाड्यांबरोबर ही इलेक्ट्रिक स्कूटरही मिळणार आहे. या स्कूटरचा उपयोग आपण कार लांब पार्किंग केलेली असल्यास तिथपर्यंत जाण्यासाठी होणार आहे. यासाठी कारमध्ये एक निर्धारित जागा देण्यात आली असून, ज्यात ही इलेक्ट्रिक स्कूटर सहजगत्या ठेवता येणार आहे. ह्युंदाईनं या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 10.5 Ah लिथियम-आयन बॅटरी दिली असून, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 20 किलोमीटरपर्यंत धावणार आहे. तिचा टॉप स्पीट 20 किलोमीटर प्रतितास आहे.विशेष म्हणजे कार चालवताना ही इलेक्ट्रिक स्कूटर कारमध्ये निर्धारित केलेल्या जागेत ठेवता येणार आहे. वाहन चालवत असताना बॅटरीतून निर्माण होणाऱ्या विजेवर ही स्कूटर आपोआप चार्ज होणार आहे. या इंटिग्रेटेड इलेक्ट्रिक स्कूटरचं वजन 7.7 किलोग्राम आहे. या स्कूटरला तीन ठिकाणी दुमडण्यात आलं आहे. वजन कमी असण्याबरोबरच तिला तीन भागात दुमडण्यात आल्यानं ती हातातून नेणंही शक्य होणार आहे.  फीचर्स या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात स्पीड आणि बॅटरीसह इतर माहिती मिळणार आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर या स्कूटरनं वाहतूक करण्यासाठी गरजेपुरती एलईडी हेडलाइट आणि दोन टेललाइट देण्यात आल्या आहेत. तसेच ह्युंदाईनं यात रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमचाही अंतर्भाव केला आहे. त्यामुळे स्कूटरचा वेग 7 टक्क्यांनी वाढणार आहे.  

टॅग्स :Hyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्स