शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

Kabira Mobility नं लाँच केली सर्वात वेगवान कमर्शिअल Electric Scooter; पाहा काय आहे विशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 14:22 IST

Kabira Mobility ही गोव्यातील एक स्टार्टअप कंपनी आहे. कंपनीनं लाँच केली सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कमर्शिअल स्कूटर

ठळक मुद्देKabira Mobility ही गोव्यातील एक स्टार्टअप कंपनी आहे.कंपनीनं लाँच केली सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कमर्शिअल स्कूटर

गोवा आधारित स्टार्ट अप कंपनी Kabira Mobility नं आपली नवीन हाय-स्पीड कमर्शियल डिलिव्हरी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. या नवीन स्कूटरला कंपनीने Hermes 75 असं नाव दिलं आहे. आकर्षक लूक आणि जबरदस्त इलेक्ट्रिक मोटर असलेल्या स्कूटरच्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 89,600 रुपये (एक्स-शोरूम, गोवा) इतकी ठेवण्यात आली आहे. 

ही नवीन इलेक्ट्रीक स्कूटर खास करून कमर्शिअल डिलिव्हरीसाठी डिझाईन केली गेली असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. Hermes 75 स्कूटरमध्ये फिक्स आणि स्वॅपैबल दोन्ही प्रकारच्या बॅटरीचा पर्याय मिळतो. एकीकडे फिक्स्ड बॅटरी सिंगल चार्जमध्ये १०० किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेज देते. तर दुसरीकेड स्वॅपेबल बॅटरी सिंगल चार्जमध्ये १२० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. सर्वात वेगवान स्कूटरया इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 2.4Kw आणि 40AH क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. ही बॅटरी केवळ ४ तासांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. यात देण्यात आलेली इलेक्ट्रीक मोटर 4000W पीक पॉवर जनरेट करते. त्याच्या मदतीनं ही स्कूटर 80 किलोमीटर प्रति तास वेगानं जाण्यास सक्षम आहे. ही देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक कमर्शिअल स्कूटर आहे. कंपनीनं यात 12 इंचाचे टायर्स दिले आहेत. तसंच यात ड्युअल डिस्क ब्रेकिंग सिस्टमही आहे. याशिवाय यात मोबाईल अॅप कनेक्टिव्हीटी, स्वॅपेबल बॅटरी, डिजिटल डॅशबोर्डसारखे फीचर्सही आहेत. या स्कूटरवरून 150 किलोपर्यंत सामान वाहून नेता येतं. तसंच यावर कार्गो स्टोरेज बॉक्सही लावण्यात आला आहे. ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही स्कूटर खरेदी करता येऊ शकते. तसंच अधिकृत डिलरशीपकडेही जून महिन्यापासून ही स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनgoaगोवाscooterस्कूटर, मोपेड