शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 20:43 IST

जाणून घेऊयात गेल्या महिन्यातील या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री झालेल्या 10 कार संदर्भात...

भारतीय वाहन बाजारपेठेत कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटच्या वाहनांना प्रचंड मागणी आहे. या वर्गात पुन्हा एकदा ह्युंदाई क्रेटाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये क्रेटाच्या पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक व्हर्जनसह एकूण 15,924 युनिट्सची विक्री झाली. मात्र, गत वर्षाच्या याच काळात (ऑगस्ट 2024) 16,762 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. अर्थात विक्रीत ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीदेखील या सेगमेंटमध्ये क्रेटाचा दबदबा कायम आहे. तर जाणून घेऊयात गेल्या महिन्यातील या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री झालेल्या 10 कार संदर्भात...

36% ने घटली ग्रँड व्हिटाराची विक्री -या सेग्मेंटच्या विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर टोयोटा हायरायडर राहिली. हायरायडरने तब्बल 39% वार्षिक वाढीसह 9,100 युनिट्सची विक्री केली. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिली मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा. या कारच्या विक्रीत तब्बल 36% एवढी मोठी घट नोंदवली गेली. या कारच्या केवळ 5,743 युनिट्सचीच विक्री झाली.

किआ सेल्टोस आणि टाटा कर्व – चौथ्या क्रमांकावर असलेल्या किआ सेल्टोसची विक्री 28% घसरणीसह 4,687 युनिट्सवर स्थिरावली. तर पाचव्या क्रमांकावरील टाटा कर्वची विक्री 50% हूनही अधिक घसरली. हिच्या केवळ 1,703 युनिट्सचीच विक्री झाली.

होंडा एलिव्हेट आणि महिंद्रा BE 6 -सहाव्या क्रमांकावरील होंडा एलिव्हेटच्या 1,660 युनिट्सची विक्री झाली, तर सातव्या स्थानावर आलेल्या महिंद्रा BE 6 चे 1,551 युनिट्स विकले गेले. 

फॉक्सवॅगन, स्कोडा आणि MG ची स्थिती चिंताजनक -आठव्या क्रमांकावर फॉक्सवॅगन टायगून 1,001 युनिट्सवर आली, हिच्या विक्रीत 38% ची घसरण झाली. तर नवव्या क्रमांकावरील स्कोडा कुशाकची स्थिती अधिकच खालावली असून तिची विक्री 47% ने कमी जाली असून केवळ 789 युनिट्सवर थांबली. या यादीतील शेवटच्या क्रमांकावर आहे MG ZS EV हिच्या केवळ 380 युनिट्सचीच विक्री होऊ शकली.

English
हिंदी सारांश
Web Title : Hyundai Creta Reigns Supreme in SUV Sales, Capturing 38% Market

Web Summary : Hyundai Creta dominated compact SUV sales in August despite a 5% dip. Toyota Hyryder saw 39% growth, while Maruti Grand Vitara fell 36%. Kia Seltos and Tata Curve also declined, while Honda Elevate and Mahindra BE 6 made gains. Volkswagen, Skoda, and MG faced significant drops.
टॅग्स :Hyundaiह्युंदाईMaruti Suzukiमारुती सुझुकीToyotaटोयोटाMG Motersएमजी मोटर्सHondaहोंडा