Jeep Grand Cherokee SUV: जीपची ऑल न्यू ग्रँड चेरोकी लाँच; सेगमेंट फर्स्ट पॅसेंजर स्क्रीनसह 110 हून अधिक फिचर्स, किंमत जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:19 PM2022-11-17T15:19:10+5:302022-11-17T15:19:45+5:30

जगभरात या ग्रँड चेरोकीची ७० लाखांहून अधिक युनिट विकली गेली आहेत. दुसऱ्या रोमध्ये मोठी लेगस्पेस मिळत आहे.

Jeep Launches All New Grand Cherokee; Over 110 features including segment first passenger screen, at 77.5 lakhs Price | Jeep Grand Cherokee SUV: जीपची ऑल न्यू ग्रँड चेरोकी लाँच; सेगमेंट फर्स्ट पॅसेंजर स्क्रीनसह 110 हून अधिक फिचर्स, किंमत जाणून घ्या...

Jeep Grand Cherokee SUV: जीपची ऑल न्यू ग्रँड चेरोकी लाँच; सेगमेंट फर्स्ट पॅसेंजर स्क्रीनसह 110 हून अधिक फिचर्स, किंमत जाणून घ्या...

googlenewsNext

मुंबई : Jeep ब्रँडने डेट्रॉईटमधील ऑटो शोमध्ये काचेच्या खिडकीतून गाडी चालवत 30 वर्षांपूर्वी या दमदार चेरोकी एसयुव्हीची एन्ट्री केली होती. नव्या चेरोकीसाठी तोच क्षण पुन्हा एकदा तयार करण्यात आला होता. 2022 Jeep Grand Cherokee ची किंमत 77.5 लाख रुपये एक्स शोरुम एवढी ठेवण्यात आली आहे. 

जगभरात या ग्रँड चेरोकीची ७० लाखांहून अधिक युनिट विकली गेली आहेत. दुसऱ्या रोमध्ये मोठी लेगस्पेस मिळत आहे. अ‍ॅक्टिव्ह ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS), 360-डिग्री सराउंड व्ह्यू, ड्रॉसी ड्रायव्हर डिटेक्शन, 3 पॉइंट सीटबेल्ट आणि सर्व 5 प्रवाशांसाठी ऑक्युपंट डिटेक्शन यासह 110 हून अधिक प्रगत सुरक्षा आणि सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. 
७३ टक्के कारची बॉडी ही उच्च क्षमतेच्या स्टीलपासून बनविण्यात आली आहे. वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह 10.1 इंचाची Uconnect 5 इन्फोटेनमेंट सिस्टीम, 10-इंच विंडशील्ड हेड्स अप डिस्प्ले, डिजिटल रीअर व्ह्यू मिरर आणि सेगमेंट फर्स्ट 10.25 इंचाची पॅसेंजर स्क्रीन देण्यात आली आहे. 

पुढच्या रांगेतील प्रवाशांसाठी लेन्थ अॅडजेस्टेबल कुशन देण्यात आले आहेत. पहिल्या दोन रोमध्ये गरम/व्हेंटेड सीट उपलब्ध आहेत. जेव्हा गरज भासते तेव्हा न्यू ग्रँड चेरोकी आपोआप फोर-व्हील ड्राइव्ह मोडवर स्विच होते. ट्रॅक्शन वाढविण्यासाठी सर्वात जास्त ग्रीप असलेल्या टायरमध्ये अॅटोमॅटीक टॉर्क पोहोचविण्याची यंत्रणा 4x4 क्वाड्रा-ट्रॅक प्रणालीद्वारे उपलब्ध होते.  SUV क्लास-लीडिंग 215 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 533 मिमी वॉटर फोर्डिंग देते. 

जीप ग्रँड चेरोकीसाठी 24X7 असिस्टंस, रिमोट व्हेईकल मॅनेजमेंट, मॉनिटर व्हेईकल पॅरामीटर्स, नेव्हिगेशन आणि कनेक्टेड ट्रॅफिक आणि ट्रॅव्हल, २४ तासांची निगरानी, स्वयंचलित क्रॅश/ब्रेकडाउन डिटेक्शन यासह 33 कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये ऑफर करण्यात आली आहेत. नवीन जीप एसयूव्हीमध्ये ३३ कनेक्टेड फिचर्स आहेत. 2 L टर्बो पेट्रोल इंजिनला 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे इंजिन 272 HP आणि 400 NM टॉर्क प्रदान करते.
 

Web Title: Jeep Launches All New Grand Cherokee; Over 110 features including segment first passenger screen, at 77.5 lakhs Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jeepजीप