शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मारुती डिझायरला पछाडत ही कार बनली इंडियन कार ऑफ द इयर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 14:05 IST

नवी दिल्ली- भारतातल्या ऑटोमोबाइल बाजारात इंडियन कार ऑफ द इयर(ICOTY) हा प्रतिष्ठित पुरस्कारांमधला एक समजला जातो. प्रत्येक वर्षी ICOTY बोर्डाचे सदस्य नव्या वाहनांची चाचणी घेऊन विजेत्या कारची घोषणा करतात.

नवी दिल्ली- भारतातल्या ऑटोमोबाइल बाजारात इंडियन कार ऑफ द इयर(ICOTY) हा प्रतिष्ठित पुरस्कारांमधला एक समजला जातो. प्रत्येक वर्षी ICOTY बोर्डाचे सदस्य नव्या वाहनांची चाचणी घेऊन विजेत्या कारची घोषणा करतात. 2018 या वर्षासाठी नव्या हुंदाई वर्ना या गाडीला इंडियन कार ऑफ द इयर या पुरस्कारासाठी निवडण्यात आलं आहे.या पुरस्काराच्या  शर्यतीत होंडा डब्लू-व्ही, जीप कंपास, मारुती डिझायर, मारुती इग्निस, रेनो कॅप्टर, स्कोडा कोडिएक, टाटा नेक्सन आणि फॉक्स वेगन या कारचा समावेश होता. हुंदाई वर्नाला 118 पॉइंट मिळाले आहेत. तर मारुती डिझायरला 117 पॉइंट आणि जीप कंपासला 87 पॉइंट मिळाले आहेत. हुंदाई वर्ना ही मिड साइज सेडान प्रकारातील कार असून, ती होंडा सिटी आणि मारुती सियाज या कारशी बरोबरी साधते. कंपनीनं नव्या कारमध्ये डिझाइनला अपडेट केलं आहे. कारचा प्रोजेक्टर हेडलँप आणि एलईडी डीआरएल देण्यात आला आहे. यात 16 इंचाचे डायमंड कट एलॉय व्हील बसवण्यात आले आहेत.नव्या वर्ना कारमध्ये 1.6 लीटरचं पेट्रोल आणि डिझेल इंजिन बसवण्यात आलं आहे. पेट्रोल इंजिन 121 बीएचपी ताकदीचं असून, 151 एनएमचं टार्क तयार करतो. तर डिझेल इंजिन 126 बीएचपीच्या ताकदीमुळे 260 एनएम टॉर्क तयार करतो. दोन्ही इंजिनसोबत तुम्हाला 6 स्पीड युनिटचं मॅन्युअल आणि 6 स्पीड युनिटचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीनं या कारची सुरुवातीची किंमत 7.99 लाखांच्या घरात ठेवली आहे. तर कारचा टॉप मॉडलची एक्स शोरूम दिल्लीमधील किंमत 12.61 लाख रुपये आहे. परंतु पेट्रोल वाहनांच्या तुलनेत डिझेल वाहनांना जास्त पसंती मिळते. 

टॅग्स :carकार