शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबुल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
3
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
4
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
5
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
6
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
7
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
8
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
9
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
10
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
11
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
12
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
13
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
14
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
15
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
16
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
17
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
18
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
19
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या

By जयदीप दाभोळकर | Updated: December 29, 2025 09:52 IST

Anti Fog Visor Helmates: कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यात मोटरसायकल चालवणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. या हवामानात बाईक रायडर्सना ज्या सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो, ती म्हणजे हेल्मेटच्या वाइजरवर जमा होणारं धुकं किंवा वाफ.

Anti Fog Visor Helmates: कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यात मोटरसायकल चालवणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. या हवामानात बाईक रायडर्सना ज्या सर्वात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो, ती म्हणजे हेल्मेटच्या वाइजरवर जमा होणारं धुकं किंवा वाफ. तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्हाला हे चांगलंच ठाऊक असेल. एक तर धुक्यामुळे रस्त्यावरील विझिबिलिटी आधीच कमी असते, त्यात हेल्मेटच्या काचेवर धुकं जमा झाल्यामुळे समोरचं दिसणं जवळपास अशक्य होतं. यामुळे अपघाताची शक्यता वाढते. म्हणूनच, थंडीत मोटरसायकल चालवताना 'अँटी-फॉग वाइजर' हेल्मेट्स खूप कामी येतात. ही हेल्मेट्स तुम्हाला अशा समस्यांपासून वाचवतात.

अँटी-फॉग वाइजरची गरज

मोटरसायकल चालवताना जेव्हा आपण श्वास सोडतो, तेव्हा शरीरातील उष्ण हवा हेल्मेटच्या काचेवर आदळते आणि ती काच धुरकट होते. यामुळे समोर पाहणं कठीण होतं आणि अपघाताचा धोका वाढतो. या समस्येवर अँटी-फॉग वाइजर हेल्मेट्स हा कायमस्वरूपी उपाय आहे. सामान्य हेल्मेटच्या काचेवर तापमानातील फरकामुळे ओलावा किंवा धुकं जमा होते, परंतु अँटी-फॉग वाइजरची रचना अशा प्रकारे केलेली असते की त्यावर ओलाव्याचे थेंब जमा होऊ शकत नाहीत. यामुळे रायडरला रस्ता अगदी स्पष्ट दिसतो आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित होतो.

अँटी-फॉग वाइजर हेल्मेट्सची फीचर्स आणि फायदे

या हेल्मेटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे धुक्यात किंवा पावसातही तुमची विझिबलिटी एकदम स्पष्ट राहते. तुम्हाला वारंवार थांबून काच साफ करण्याची गरज पडत नाही. तसेच, हे हेल्मेट थंडीपासूनही संरक्षण करतं. जेव्हा सामान्य हेल्मेटवर वाफ जमा होते, तेव्हा रायडरला नाईलाजानं वाइजर थोडे उघडावे लागते, ज्यामुळे बोचरी हवा थेट चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर लागते. अँटी-फॉग हेल्मेटमुळे तुम्ही काच पूर्णपणे बंद ठेवून आरामात प्रवास करू शकता.

स्वच्छता आणि काळजी घेण्याची पद्धती

हे हेल्मेट्स स्वच्छ करणं अत्यंत सोपं आहे. ते साफ करण्यासाठी नेहमी 'मायक्रोफायबर' कापडाचाच वापर करावा. हेल्मेटची काच म्हणजेच वाइजर साफ करण्यासाठी हार्ड केमिकल, साबण किंवा कॉलीन सारख्या स्प्रेचा वापर टाळावा. साधं पाणी स्वच्छतेसाठी सर्वात उत्तम आहे. तुम्ही साध्या पाण्यात कापड ओलं करूनही ते साफ करू शकता.

कोणासाठी आहे फायदेशीर आणि कुठे मिळेल?

ज्यांना पहाटे लवकर किंवा उशिरा रात्री धुक्यातून बाईक चालवावी लागते, त्यांच्यासाठी चांगल्या दर्जाचे अँटी-फॉग हेल्मेट खरेदी करणे ही एक उत्तम गुंतवणूक ठरू शकते. हे केवळ तुमचा प्रवास सुखावह करत नाही, तर रस्त्यावरील तुमची सुरक्षाही सुनिश्चित करते. भारतात स्टीलबर्ड, स्टड्स आणि टीव्हीएस यांसारख्या अनेक कंपन्या अँटी-फॉग वाइजर हेल्मेट्स तयार करतात, जे गुणवत्तेच्या बाबतीत उत्कृष्ट असतात. तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानातून किंवा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून हे हेल्मेट खरेदी करू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Anti-fog visor helmets: A must for safe winter bike rides.

Web Summary : Anti-fog visor helmets enhance visibility in foggy conditions, preventing accidents. They eliminate fog build-up, ensuring clear vision and safer rides, especially during cold weather. Available at local and online stores.
टॅग्स :bikeबाईक