महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या २१ व्या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. या सामन्यात ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. जागतिक स्तरावर हा पराक्रम करणारी ती २० वी महिला क्रिकेटपटू आहे.
२०१० पासून एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या चामारी अटापट्टूने १२० सामन्यांमध्ये ३५.१७ च्या प्रभावी सरासरीने ४ हजार ४५ धावा केल्या आहेत. या विक्रमामुळे, ती श्रीलंकेसाठी दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू शशिकला सिरीवर्धने (११८ सामन्यांत २ हजार २९ धावा) आणि तिसरी दिलीनी मनोदरा (१ हजार ३६३ धावा) यांच्यापेक्षा खूप पुढे गेली आहे.
सध्याच्या विश्वचषकात श्रीलंकेचा संघ संघर्ष करत आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. रद्द झालेल्या सामन्यांमुळे दोन गुण गमावून, श्रीलंका सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. दरम्यान, बांगलादेश एका विजयासह सहाव्या स्थानावर असून, पाकिस्तान आठव्या स्थानावर आहे.
Web Summary : Chamari Athapaththu achieved a milestone in Women's ODI World Cup, surpassing 4000 runs. She's the first Sri Lankan woman to reach this feat, globally ranking 20th. Despite this, Sri Lanka struggles in the World Cup, ranking seventh after five matches.
Web Summary : चमारी अटापट्टू ने महिला वनडे विश्व कप में 4000 रन बनाकर इतिहास रचा। वह यह उपलब्धि हासिल करने वाली पहली श्रीलंकाई महिला हैं, जो विश्व स्तर पर 20वें स्थान पर हैं। इसके बावजूद, श्रीलंका विश्व कप में संघर्ष कर रहा है, और पांच मैचों के बाद सातवें स्थान पर है।