शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

आश्चर्य ! आता 'या' कारला साइड मिरर नसणार, लवकरच येणार बाजारात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 13:38 IST

सियोल ऍडव्हान्स टेक्नॅालॅाजीमुळे दिवसेंदिवस कारमध्ये अत्याधुनिक सुविधा मिळत असून, ग्राहकांच्याही या सुविधा चांगल्याच पसंतीस उतरत आहेत.

मुंबई: सियोल ऍडव्हान्स टेक्नॅालॅाजीमुळे दिवसेंदिवस कारमध्ये अत्याधुनिक सुविधा मिळत असून, ग्राहकांच्याही या सुविधा चांगल्याच पसंतीस उतरत आहेत. अशा प्रकारची एक अत्याधुनिक कार लवकरच बाजारात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर जर साइडला मिरर नसलेल्या कार धावताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको, कारण दक्षिण कोरियातील ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यापैकी एक असलेल्या Hyundai Mobisने कॅमेरा मॅानिटरिंग कार्यप्रणाली निर्माण केली आहे. त्यामुळे पुढील जनरेशनमध्ये साइड मिररची जागा हे कॅमेरा घेणार असल्याचे समजते.Hyundai Mobis या कंपनीच्या माहितीनुसार, या कॅमेरा मॅानिटरिंग कार्यप्रणालींतर्गत गाडीमध्ये तीन चांगल्या दर्जाचे कॅमेरा सेन्सर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे ड्रायव्हिंग सेफ्टी वाढणार असून, मायलेज देखील सुधारेल. कारमधले हे साइड मिरर आता कारच्या आतमध्येच असल्यानं साइट मिररची गरज भासणार नाही. साइड मिररचं म्हणजेच कारच्या दोन्ही बाजूंच्या मिररचं काम हे लपलेले कॅमेरे करणार आहेत.  Hyundai Mobis या कंपनीच्या ऑटोनोमस डेव्हलपमेंटचे इन्चार्ज अधिकारी ग्रेगरी बॅराटॅाफ यांनी सांगितले की, पुढील काळात कारमध्ये अत्याधुनिक आणि नवनवे बदल करणं गरजेचं आहे. ज्याच्यावर आतापर्यंत जास्त लक्ष्य केंद्रित करण्यात आलेले नाही. तसेच कंपनी फक्त सेन्सर्स आणि त्यावर आधारित असलेल्या टेक्नॉलॅाजीत बदल करणार आहे. यामुळे पुढील येणाऱ्या कारच्या सुरक्षेचा विचार करता कंपनीच्या आणखी मजबूत पार्ट बनवण्याच्या विचाराधीन आहे. 

टॅग्स :Automobileवाहनcarकार