शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 20:46 IST

यामुळे ग्राहकांना जबदस्त फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय बाजारात, ही कार टाटा पंच, रेनॉल्ट किगर आणि निसान मॅग्नाइट सारख्या मॉडेल्सची स्पर्धक आहे...

ह्युंदाईच्या एंट्री-लेव्हल एक्सटर एसयूव्हीला अद्यापही ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये क्रेटा आणि व्हेन्यू नंतर, ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. जर आपण सप्टेंबर महिन्यात ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर लक्षणीय सूट मिळू शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, सध्या कंपनी या कारवर ₹५०,००० ची सूट देत आहे. याशिवाय, २२ सप्टेंबरपासून, हिच्यावर टॅक्सच्या ₹८६,१५६ रुपयांचीही बचत होईल. 

यामुळे ग्राहकांना जबदस्त फायदा होणार आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय बाजारात, ही कार टाटा पंच, रेनॉल्ट किगर आणि निसान मॅग्नाइट सारख्या मॉडेल्सची स्पर्धक आहे. हिच्या पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज १९ किमी/लीटर, तर सीएनजी व्हेरियंटचे मायलेज २७.१ किमी/किलो एवढे आहे.

एक्सटरची सध्याची एक्स-शोरूम किंमत साधारणपणे ₹५९९,९०० एवढी आहे. २२ सप्टेंबरपासून, तिची नवी किंमत साधारणपणे ₹५६८,०३३ असेल. अर्थात किमान ₹३१,८६७ आणि टॉप मॉडेलवर कमाल ₹८६,१५६ ची बचत होईल. Xter वरील डिस्काउंटसंदर्भात बोलायचे झाल्यास, EX पेट्रोल व्हेरिएंटवर ₹५,०००, EX CNG व्हेरिएंटवर ₹२५,०००, CNG S Smart आणि SX Smart व्हेरिएंटवर ₹४५,०००, इतर CNG व्हेरिएंटवर ₹५०,०००, MT पेट्रोल व्हेरिएंटवर (S Smart/SX Smart आणि इतर) ₹४५,००० आणि AMT पेट्रोल व्हेरिएंटवर (सर्व) ₹५०,००० पर्यंतच्या डिस्काउंटचा समावेश आहे.

Hyundai Xter EX व्हेरिएंटची वैशिष्ट्ये -या व्हेरिएंटमध्ये १.२-लिटर पेट्रोल MT इंजिन असेल. हिच्या फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास. हिच्या मध्ये, सहा एअरबॅग्ज, EBD सह ABS, सेंट्रल लॉकिंग, कीलेस एंट्री, सर्व सीट्ससाठी ३-पॉइंट सीट बेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, LED टेल लॅम्प, बॉडी-कलर्ड बंपर,  डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ४.२-इंच MID सह, मल्टीपल रीजनल UI भाषा, फ्रंट पॉवर विंडो, अॅडजस्टेबल रिअर हेडरेस्ट, मॅन्युअल एसी, ड्रायव्हर सीट हाइट एडजेस्टमेंट, रियर पार्किंग सेंसर, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (केवळ EX (O)), हिल स्टार्ट असिस्ट (केवळ EX (O)) आणि व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (केवळ EX (O)), याशिवाय इतरही अनेक फीचर्सचा समावेश आहे.

 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहनGSTजीएसटी