भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी ह्युंदाईने आपली लोकप्रिय मिड-साईज एसयूव्ही क्रेटा समर एडिशन लॉन्च केले आहे. कमी किंमतीत आकर्षक डिझाइन आणि दमदार फीचर्समुळे या कारने बाजारात खळबळ उडवून दिली आहे. हे एडिशन केवळ १.५-लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात टर्बो-पेट्रोलचा पर्याय देण्यात आलेला नाही.
ह्युंदाई क्रेटा समर एडिशन: किंमत
ह्युंदाई क्रेटा समर एडिशनची सुरुवातीची किंमत ₹१२.०६ लाख (एक्स-शोरूम) असून टॉप मॉडेलची किंमत ₹१७.८९ लाखांपर्यंत जाते. ही विशेष आवृत्ती EX, S(O), आणि S(O) Knight या ट्रिम्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत या एडिशनची किंमत १० ते ५५ हजारांनी वाढली आहे.
ह्युंदाई क्रेटा समर एडिशन: डिझाईन
क्रेटा समर एडिशनचा लूक अत्यंत आधुनिक आहे. यात क्वाड-बीम एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल आणि नवीन टेललाइट्स देण्यात आले आहेत. १६ आणि १७ इंची स्टायलिश अलॉय व्हील्ससोबतच कारवर बॅजिंग आणि युनिक कलर ऑप्शन्स मिळतात.
ह्युंदाई क्रेटा समर एडिशन: सेफ्टी फीचर्स
ह्युंदाईने सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. या कारमध्ये ग्राहकांना ६ एअरबॅग्ज मिळतात. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल देण्यात आले. शिवाय, ग्राहकांना हिल असिस्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर्सही मिळत आहे. या कारच्या निवडक व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम देण्यात आले.
Web Summary : Hyundai launched the Creta Summer Edition, a mid-size SUV with attractive design and features, available in petrol and diesel. Starting at ₹12.06 lakh, it offers LED headlamps, alloy wheels, 6 airbags, and electronic stability control, with advanced driver assistance in select variants.
Web Summary : हुंडई ने क्रेटा समर एडिशन लॉन्च किया, जो पेट्रोल और डीजल में उपलब्ध है। ₹12.06 लाख से शुरू, इसमें एलईडी हेडलैंप, अलॉय व्हील, 6 एयरबैग और इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल हैं। कुछ वेरिएंट्स में एडवांस्ड ड्राइवर असिस्टेंस सिस्टम भी है।