शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या पाठीमागचा अतिरिक्त रेअर बंपर गार्ड किती कामाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 12:13 IST

कारच्या अतिरिक्त साधनसामग्रीमध्ये अनेक अनावश्यक गोष्टींचा भरणा करून ठेवण्याची सवय काहींना लागते. त्यामागे दर्शनीयता वाढवणे, एखाद्याचे अनुकरण करणे, माहिती न घेता कोणी सांगितले म्हणून स्वतःच त्या साधनसामग्रीचा वापर करणे अशी कारणे आढळून येतात.

कारच्या अतिरिक्त साधनसामग्रीमध्ये अनेक अनावश्यक गोष्टींचा भरणा करून ठेवण्याची सवय काहींना लागते. त्यामागे दर्शनीयता वाढवणे, एखाद्याचे अनुकरण करणे, माहिती न घेता कोणी सांगितले म्हणून स्वतःच त्या साधनसामग्रीचा वापर करणे अशी कारणे आढळून येतात. हॅचबॅक, सेदान, एमयूव्ही वा विशेष करून छोट्या आकाराच्या मोटारींनाही अशी काही साधने लावली जातात की, जी अनावश्यक असतात. कारचे निर्माते काही अशा साधनांची शिफारसही करीत नाहीत. पण तरीही काही भीतीने, काही आकर्षणापायी ही सामग्री कारला जोडतात. उपयुक्ततेची बाबही लक्षात न घेता ते अशी साधने घेत असतात. हॅचबॅक, सेदान वा छोट्या आकाराच्या मोटारींच्या मागील बंपरवर अतिरिक्त गार्ड लावण्याची एक फॅशन दिसून येते. फ्रंट गार्डप्रमाणेच वास्तविक या गार्डचीही आवश्यकता नसते. उलट नवी कार असेल तर अशी साधने कारच्या बॉडीला वेल्ड करून जोडली गेल्याने वॉरंटी वैध होणार नाही, अशा स्वरूपाचा इशाराही कारच्या सर्व्हिस सेंटरकडून वा वितरकाकडून दिला जातो. अर्थात तो चर्चेचा वेगळा विषयही होऊ शकतो.

पण काही साधनांबाबत असा इशारा उपयुक्तही ठरतो. या रेअर गार्डचा काही उपयोग नसतो. मागच्या बाजूला कारबॉडीला तो ज्या पद्धतीने जोडला जातो, त्याची मजबुतीही गार्डम्हणून होऊ शकत नाही. उलट कारचे वजन मात्र विनाकारण वाढते. तो लोखंडाच्या कोयताकृती पट्टीवर वेल्डिंग व नटबोल्टने जोडलेला असतो. काहीवेळा प्रवासात कटकट होऊन बसते. त्याच्यावर काही मागील बाजूने कारने वा अन्य वाहनाने धडक दिली तर कारचे नुकसान होणार नाही, अशी समजूत लोक करून घेतात. वास्तविक या गार्डच्या संलग्नतेची व जोडणीची स्थिती पाहिली तर तो गार्ड किती तकलादू आहे हे लक्षात येईल. त्याने ना संरक्षण होत ना सौंदर्य वाढत. उगाच पैसे खर्च होतात. अशाच एका गार्डला बाहेरगावी गेलेल्या एका मोटारमालकाला वेगळाच अनुभव आला.  दगडावर मागीलबाजू लागल्याने गार्डची जोडणी एकाबाजूने वेल्डिंग तुटून बाजूला झाल्याने तो दोर बांधून गॅरेजला गाडी आमली व वेल्डिंग करणे तेथे शक्य नसल्याने दुसरी जोडलेली बाजू बाजूला करावी लागली. कारच्या डिक्कीत ठेवून तो गार्ड शहरापर्यंत आणावा लागला.

पण शहरात वेल्डिंगवाल्याने तो गार्ड पुन्हा वेल्ड करणे शक्य नाही, तो अधिक तकलुपी होईल असे सांगून गार्ड भंगारात काढायला सांगितला. रेअर गार्डची ही अनुभूती घेतल्यानंतर त्या मोटारमालकाला समज आलू, हेच विशेष. मुळात अशा प्रकारच्या साधनांना कारला लावण्यापूर्वी दहादा विचार करावा, त्या साधनाची उपयुक्तता पाहावी, त्याची खरंच गरज आहे का, याचाही शास्त्रीय विचार करावा. तसे करूनही अशा निरुपयोगी साधनाला जर लावले गेले तर पुढे कटकटीला सज्ज राहावे. या मागील गार्डवर लहानमुले खेळताना उबी राहिली तरी तो वाकतो. वेल्डिंग खराब असेल तर तुटते. यासाठी पैसे खर्च करण्यापूर्वी सर्व बाजूने विचार करावा. अन्यथा गार्डचा उपयोग होण्याऐवजी त्रास मात्र पदरी पडतो.  

टॅग्स :carकार