शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Revolt RV400 EMI: जेवढे महिन्याला पेट्रोलला लागतात तेवढाच EMI भरा; 20000 रुपयांत Revolt RV400 घरी आणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:41 IST

Revolt RV400 Bike Loan DownPayment EMI Details: रिव्होल्ट आरव्ही ४०० ला लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्कूटर चालविणारे देखील आहेत. त्यांनी धाडस केले म्हणून आज पैसे वाचवू शकले आहेत.

आता जवळपास सर्वांचे इलेक्ट्रीक बाईक, स्कूटर बाबतचे गैरसमज दूर झाले असतील एवढी मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध झाली आहे. कंपन्यच एवढ्या झाल्यात की कोणती घेऊ, कोणती नको असा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्कूटरमध्ये अनेक पर्याय आहेत परंतू मोटरसायकलमध्ये दोन-तीनच पर्याय आहेत. यापैकी एक तीन वर्षे जुना आणि दुसरा काही दिवस झालेत. 

रिव्होल्ट आरव्ही ४०० ला लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही स्कूटर चालविणारे देखील आहेत. त्यांनी धाडस केले म्हणून आज पैसे वाचवू शकले आहेत. तुम्ही ही इलेक्ट्रीक स्कूटर जेवढे पैसे तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी खर्च करता तेवढे पैसे ईएमआय देऊन घरी आणू शकता. चला जाणून घेऊया.

रिव्होल्टची बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 20000 रुपयांचे डाऊनपेमेंट भरावे लागणार आहे. रिव्होल्ट आरव्हीची किंमत 1,24,999 रुपये ऑनरोड आहे. यामध्ये 3.24 KWh इलेक्ट्रीक मोटर लावलेली आहे. सिंगल चार्जमध्ये ही मोटरसायकल 150 किमीची रेंज देते. प्रत्यक्षात ही मोटरसायकल 110 किमीची रेंज देते. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी साडे चार तास लागतील. 

जर तुम्ही 20000 रुपये डाऊन पेमेंट करून ही स्कूटर विकत घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला कर्जाचा आणि हप्त्यांचा विचार करावा लागणार आहे. तुम्हाला 1,04,999 रुपयांचे कर्ज मिळेल. त्यावर 9 टक्क्यांच्या हिशेबाने तीन वर्षांसाठी कर्ज घेतल्यास दर महिन्य़ाला 3,704 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. तीन वर्षांसाठी 28 हजार रुपये व्याज द्यावे लागेल. पेट्रोलचा विचार केला तर 3,704  रुपयांचे पेट्रोल तुम्हाला दर महिन्याला लागत असेल. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर