शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Honda Discount Offer : होंडा स्कूटर आणि बाइक्स 5 हजारांपर्यंत कॅशबॅक, झिरो डाउन पेमेंट व No Cost EMI वर करू शकता खरेदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:12 IST

Honda Discount Offer : कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या जाहिरातीनुसार, या सणासुदीच्या हंगामात कोणत्याही होंडा स्कूटर किंवा बाइकच्या खरेदीवर कंपनी 5 टक्के कॅशबॅक देत आहे, जे कमाल 5 हजार रुपयांपर्यंत आहे.

नवी दिल्ली : होंडा टू व्हीलर्स इंडियाने (Honda Two Wheelers India) देशात सुरू झालेल्या सणासुदीच्या हंगामात आपल्या टू-व्हीलर रेंजची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सणाच्या ऑफर्स सादर केल्या आहेत. ज्यामध्ये कंपनी सध्याच्या स्कूटर आणि बाइक्सच्या रेंजवर कॅशबॅक व्यतिरिक्त झिरो डाउन पेमेंट, नो कॉस्ट ईएमआय सारख्या आकर्षक ऑफर देत आहे.

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या जाहिरातीनुसार, या सणासुदीच्या हंगामात कोणत्याही होंडा स्कूटर किंवा बाइकच्या खरेदीवर कंपनी 5 टक्के कॅशबॅक देत आहे, जे कमाल 5 हजार रुपयांपर्यंत आहे. यानंतर कंपनी ग्राहकांचे बजेट लक्षात घेऊन फायनान्स प्लॅन अंतर्गत खरेदी केलेल्या टू व्हीलरवर काही अटींसह झिरो डाऊन पेमेंट ऑफर करत आहे. यानंतर, कंपनीची तिसरी ऑफर नो कॉस्ट ईएमआय आहे, जी सर्व होंडा स्कूटर आणि बाइकवर लागू असणार आहे. कंपनी काही अटींसह ही नो कॉस्ट ईएमआय ऑफर करत आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय जमा करावा लागेल.

या सणाच्या ऑफरमध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या कॅशबॅक ऑफरसाठी कंपनीने स्टँडर्ड चार्टर्ड, फेडरल बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक, वनकार्ड यांसारख्या आघाडीच्या बँका आणि वित्त कंपन्यांशी करार केला आहे. होंडाने जारी केलेल्या या सणाच्या ऑफरद्वारे स्कूटर किंवा बाइक खरेदी करणारे ग्राहक या ऑफरची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा या ऑफरबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या होंडा टू व्हीलर शोरूमला भेट देऊ शकतात.  होंडाने जारी केलेली ही डिस्काउंट ऑफर देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलू शकते.

दरम्यान, कंपनीने नुकतीच आपली सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर होंडा अॅक्टिव्हाचे (Honda Activa) प्रीमियम एडिशन लाँच केले आहे.  होंडा अॅक्टिव्हा ही ऑगस्ट महिन्यात आपल्या कंपनीसह देशात सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर बनली आहे. याशिवाय, कंपनीने होंडा शाईनचे (Honda Shine) सेलिब्रेशन एडिशन देखील लाँच केले आहे. होंडा शाईन ही कंपनीच्या बाइक सेगमेंटची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे, जी ऑगस्ट महिन्यात देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाइक बनली आहे.

टॅग्स :Hondaहोंडाbikeबाईक