शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

होंडा-निस्सान विलिनीकरण होण्यापूर्वीच धक्का? मित्सुबिशीचा डीलमधून बाहेर पडण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:44 IST

एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा विलिनीकरण करण्याचा विचार या कंपन्यांत सुरु आहे. यामुळे खर्च कमी होणार असून नफ्यात वाढ होणार आहे. होंडा, निस्सान आणि मित्सुबिशी या तीन कंपन्यांचे विलिनीकरण केले जाणार होते.

चिनी कंपन्यांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जपानच्या तीन कंपन्या एकत्र येणार होत्या. परंतू, एकत्र येण्यापूर्वीच या डीलला मोठा धक्का बसला आहे. होंडा, निस्सान आणि मित्सुबिशी या तीन कंपन्यांचे विलिनीकरण केले जाणार होते. परंतू, आता या डीलमधून मित्सुबिशीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाहन क्षेत्रातील मोठी घडामोड येत्या काळात होऊ घातली आहे. एकीकडे फोक्सवॅगन सारखी जगातील एक नंबरची जर्मन कंपनी आपल्या देशातील प्लांट एकामागोमाग एक बंद करत असताना जपानच्या तीन कंपन्यांमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या होत्या. ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, चिनी कंपन्यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी जपानच्या तीन कंपन्यांचे विलिनीकरण होण्याची शक्यता होती. जपान हा जगातील सर्वात मोठा वाहन निर्माण करणारा देश आहे. या देशातील कंपन्यांना चीनकडून आव्हान मिळू लागल्याने या कंपन्यांनी धास्ती घेतली आहे. 

एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा विलिनीकरण करण्याचा विचार या कंपन्यांत सुरु आहे. यामुळे खर्च कमी होणार असून नफ्यात वाढ होणार आहे. सध्या या कंपन्यांचे बाजारमुल्य ५० अब्ज डॉलर एवढे आहे. मित्सुबिशीने सुरुवातीला आपण या डीलमधील आपल्या स्थानाचे अवलोकन करणार असल्याचे म्हणत सावध पवित्रा घेतला होता. परंतू, या डीलमध्ये कंपनीला दुय्यम स्थान असल्याचे लक्षात आल्यावर या डीलमधून बाहेर पडण्याचा मार्ग कंपनीने स्वीकारला आहे. 

जपानी वृत्तपत्र योमिउरीनुसार मित्सुबिशीने विलीनीकरणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. होंडा आणि निसानच्या विलीनीकरणातून स्थापन झालेली कंपनी उद्योगातील सर्वात मोठ्या कार कंपन्यांपैकी एक बनेल. जपानी कार निर्माता कंपनी मित्सुबिशीने होंडा आणि निसानला नव्याने स्थापन झालेल्या होल्डिंग कंपनीत सामील होण्याचा विचार केला होता. या वृत्ताचे कंपनीने खंडण केलेले नाही. एक निवेदन सादर करत कंपनी अजूनही पर्यायांचे मूल्यांकन करत असल्याचे म्हटले आहे. 

निसान ही मित्सुबिशीमध्ये २४ टक्के हिस्सा असलेली सर्वात मोठी शेअरहोल्डर आहे. यामुळे मित्सुबिशीच्या या निर्णयाचा कितपत परिणाम होणार याकडे ऑटो क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे फ्रान्सची कंपनी रेनोकडे निस्सानचे  १५ टक्के शेअर्स आहेत. होंडाला रेनो कंपनीने या विलिनीकरणात सहभागी व्हावे असे वाटत नाहीय. दुसरीकडे, फ्रेंच ऑटोमेकर रेनोचा निसानमध्ये १५ टक्के हिस्सा आहे मित्सुबिशी या डीलवर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. 

रेनोच्या माजी प्रमुखांचा होंडावर मोठा दावा...

होंडा निसान आणि मित्सुबिशीचे गुप्त अधिग्रहण करू इच्छित आहे, असा दावा रेनॉल्टचे माजी प्रमुख कार्लोस घोसन यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये केला होता. होंडा इतर दोन जपानी ब्रँडपेक्षा मोठी आहे. यामुळे होंडा अन्य छोट्या कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याच्या स्थितीत येते, असे त्यांचे म्हणणे होते. 

टॅग्स :Mitsubishiमित्सुबीशीHondaहोंडाNissanनिस्सान