Honda Amaze भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सब-कॉम्पॅक्ट सेडान कार्सपैकी एक आहे. जपानची वाहन उत्पादक कंपनी होंडाच्या बेस्ट सेलिंग कार्सपैकी ही एक आहे. या कारची टक्कर Maruti Suzuki Dzire, Hyundai Aura, Ford Aspire, Volkswagen Ameo सारख्या कार्ससोबत आहे. 2018 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सेकंड जनरेशन होंडा अमेझ लाँच केल्यानंतर कंपनी आता या कारचं फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. (honda amaze facelift 2021 booking starts in with just rs 5000 token amount check amazing features and price)
Honda कंपनी 18 ऑगस्ट रोजी Honda Amaze ही नवीन कार फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लाँच करणार आहे. नवीन Honda Amaze साठी कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन प्री-बुकिंग 5 हजार रुपयांत करता येईल, तर डीलरशिप्समध्ये प्री-बुकिंगसाठी 21 हजार रुपये टोकन अमाऊंट असेल. नवीन फेसलिफ्ट मॉडलमध्ये डिझाइन अपडेटसोबतच नवीन फीचर्स मिळणार असून, ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार असल्याचं सांगितलं जात आहे.
Honda Amaze Facelift मध्ये नवं काय?अमेझ फेसलिफ्ट काही नवीन आकर्षक रंगांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. कारमध्ये फुल एलईडी हेडलँप, नवीन अलॉय व्हील्स, नवीन फ्रंट आणि रिअर बंपर मिळण्याची शक्यता आहे. कारच्या समोरील बाजूला जास्त क्रोम एलिमेंटचा वापर केलेला दिसू शकतो, तर इंटीरियरमध्ये नवीन फॅब्रिक अपहोल्स्ट्री आणि नवीन डॅशबोर्ड लेआउट मिळेल. सेच कारच्या बेसिक व्हेरिअंटमध्ये जास्त स्टँडर्ड फीचर्सचा समावेश झालेला असेल. यासोबतच नवीन होंडा अमेझ फेसलिफ्टच्या किंमतीतही थोडीफार वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
किती असेल किंमत?2021 होंडा अमेझ फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलमधील इंजिन आणि गिअरबॉक्सचाच वापर केला जाईल, असं सांगितलं जात आहे. सध्या पेट्रोल व्हर्जन इंजिन 1.2 लीटर आणि डिझेल व्हर्जनमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिनसह होंडा अमेझ येते. आताच्या घडीला अमेझची एक्स-शोरुम किंमत 6.22 लाख ते 9.99 लाख रुपये आहे. नवीन फेसलिफ्ट अमेझची किंमत 25 हजारांनी किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते, असे सांगितले जात आहे.