शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Honda Activa बंद होणार? आता 7G मॉडेल येणार नाही, जाणून घ्या स्कूटरशी संबंधित नवीन अपडेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 09:37 IST

Honda Activa : कंपनीने याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही.

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत स्कूटरचे नाव घेतल्यावर एकच नाव डोळ्यासमोर येते, ते म्हणजे 'होंडा अॅक्टिव्हा'. बाजारातील गेली दोन दशके अ‍ॅक्टिव्हाची राजवट कोणीही हलवू शकलेले नाही. पण आता होंडा एक मोठा बदल करणार आहे. अॅक्टिव्हाचे शेवटचे मॉडेल आता होंडा अॅक्टिव्हा 6G असणार आहे. आता अॅक्टिव्हा 7G बाजारात येणार नाही.  तसेच, आता अॅक्टिव्हासोबत इतर कोणतेही बॅजिंग येणार नाही. नुकत्याच समोर आलेल्या स्कूटरच्या फोटोंवरून हे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, कंपनीने याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. तसेच अ‍ॅक्टिव्हाचे नाव आता बदलले जाईल की फक्त बॅजिंगवरून जनरेशन मार्क काढून टाकले जाईल हेही सांगण्यात आलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅक्टिव्हाचे नवीन मॉडेल लॉन्च झाल्याच्या बातम्याही येत होत्या. पण आत्तापर्यंत कंपनीने नवीन स्कूटरबाबत कोणतेही अपडेट जारी केलेले नाही. आता असे म्हटले जात आहे की, नवीन अॅक्टिव्हा या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होऊ शकते. परंतु कंपनी या स्कूटरचे नाव बदलेल की नाही याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

H Smart केले होते लाँच   यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये कंपनीने अ‍ॅक्टिव्हा एच स्मार्च लॉन्च केले होते. या स्कूटरच्या फीचर्समध्ये बदल झाला आणि रिमोट लॉकिंग सिस्टमसह अपग्रेड करण्यात आला होती. भारतात या स्कूटरची सुरुवातीची किंमत 74,536 रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली होती.

बदल करण्याचे कारणकंपनी यापुढे अॅक्टिव्हा बॅजिंग अंतर्गत नवीन जनरेशन लॉन्च करू इच्छित नाही. स्कूटरला पूर्णपणे नवीन लूक आणि फीचर्स देण्यासोबतच कंपनी ती एका नवीन प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्याचा विचार करत आहे, असे म्हटले जात आहे. दरम्यान, यामुळे होंडाच्या स्कूटर ब्रँडला हानी पोहोचण्याची शक्यता नसली तरी नवीन स्कूटर देखील अ‍ॅक्टिव्हा सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. तसेच, स्कूटरला फीचर्ससह अपडेट केल्यास परफॉर्मन्स अधिक चांगला होईल. 

टॅग्स :Hondaहोंडाscooterस्कूटर, मोपेड