शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Hero Lectro Mountain E-Bike: भन्नाट थ्रील! घर ते ऑफिस अवघ्या काही रुपयांत; ऑफरोडही चालवा ही ई-सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 13:13 IST

Hero Lectro Mountain E-Bike F2i, F3i: ही भारतातील पहिली कनेक्टेड ई माऊंटेन बाईक आहे. यामध्ये अँडव्हेंटर राईडसाठी स्पोर्टी फ्रेमसह डिझाईन करण्यात आले आहे. ही ई बाईक शहर आणि गावात देखील वापरता येणार आहे. 

हिरोने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रीक सायकल लाँच केली आहे. याचे नाव F2i आणि F3i आहे. ही इलेक्ट्रीक सायकल शहरातील गुळगुळीत रस्ते तसेच ऑफ रोड देखील चालविता येणार आहे. ही सायकल चालविताना स्कूटर चालविल्याचा अनुभव मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.  

Electric Scooter Vs. Bike: इलेक्ट्रीक स्कूटर घेऊ की बाईक? आधी फरक समजून घ्या...; सोपे जाईल

ही भारतातील पहिली कनेक्टेड ई माऊंटेन बाईक आहे. यामध्ये अँडव्हेंटर राईडसाठी स्पोर्टी फ्रेमसह डिझाईन करण्यात आले आहे. ही ई बाईक शहर आणि गावात देखील वापरता येणार आहे. 

या सायकलला तुम्ही एका अॅपद्वारे कंट्रोल करू शकता. ही सायकल ब्ल्यूटूथद्वारे आरामात कनेक्ट होते. ही सायकल चार ऑपरेशन मोडसोबत येते. यामध्ये पेडलेक (35 किमी रेंज), थ्रॉटल (27 किमी रेंज), क्रूझ कंट्रोल आणि मॅन्युअल मोड आहेत. ही एक हायब्रिड सायकल आहे. पॅडल आणि बॅटरी आदीवर ही सायकल आरामात चालते. पॅडल मारून दमलात तर याचा ऑपरेशन मोड ऑन करून बॅटरीवर चालू शकते. यामध्ये एक स्मार्ट एलईडी डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. 

बॅटरीदोन्ही सायकलमध्ये इलेक्ट्रिक-एमटीबी एक हाय कॅपॅसिटीची 6.4Ah IP67 रेटेड बॅटरी आणि एक हाय टॉर्कची 250W BLDC मोटर देण्यात आली आहे. यामध्ये 7 स्पीड गिअर देण्यात आला आहे. ही ई बाईक सिंगल चार्जवर ३५ किमीची रेंज देते. हिरो लेक्ट्रो (Hero Lectro) ही कंपनीच्या आरअँडडी सेंटरमध्ये डिझाईन करण्यात आली आहे. या ई बाईकची किंमत 39,999 रुपये आणि 40,999 रुपये आहे. 

बुकिंग कसे कराल...Hero Lectro F2i आणि Hero Lectro F3i घेण्याचा विचार करत असाल तर कंपनीचे ६०० हून अधिक डिलर्स आहेत. त्यांच्याकडे नाहीतर तुम्ही ऑनलाईनदेखील ही ई-बाईक बुक करू शकता.  

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन