शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Hero Electric ने आणली Hero Eddy इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा फीचर्स आणि लॉन्चिंग डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 15:36 IST

Hero Eddy Electric Scooter : जे लोक दररोज कमी अंतराचा प्रवास करतात, जसे की कॉफी शॉपमध्ये जाणे, भाजी घेण्यासाठी जाणे, खरेदीसाठी जाणे, अशा ग्राहकांसाठी ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर डिझाइन केली आहे.

नवी दिल्ली : हिरो इलेक्ट्रिकने हिरो एडी (Hero Eddy) इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत आज म्हणजेच 1 मार्च रोजी सादर केली आहे. कंपनी पुढील तिमाहीत लॉन्च करण्याचा विचार करत आहे. जे लोक दररोज कमी अंतराचा प्रवास करतात, जसे की कॉफी शॉपमध्ये जाणे, भाजी घेण्यासाठी जाणे, खरेदीसाठी जाणे, अशा ग्राहकांसाठी ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर डिझाइन केली आहे. ग्राहकांना टेक्नॉलॉजीसह सर्वोत्कृष्ट फीचर्स देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

फीचर्सHero Eddy मध्ये अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, फाइंड माय बाईक, एक मोठी बूट स्पेस, हेडलॅम्प आणि रिव्हर्स मोड इत्यादी देण्यात आले आहे. हिरो इलेक्ट्रिक पुढील तिमाहीत हे उत्पादन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनी लॉन्च दरम्यान या ई-स्कूटरचे अतिरिक्त फीचर्स आणि किंमत याबाबत सांगण्याची शक्यता आहे. 

कलर ऑप्शनHero Eddy electric scooter दोन कलर ऑप्शनसह ऑफर केली आहे, ज्यामध्ये पिवळा आणि हलक्या निळ्या कलरचा समावेश आहे. या ई-स्कूटरची खास गोष्ट म्हणजे, चालवायला लायसन्सची गरज भासणार नाही आणि रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.

काय म्हणाले कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक?हिरो इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल म्हणाले की, आम्ही आमचे आगामी उत्पादन Hero Eddy ची घोषणा करताना आनंदी आहोत, ज्यात स्मार्ट फिचर्स आणि स्टायलिश लुक यांचा मेळ आहे. स्कूटरची रचना त्रासमुक्त राइडिंग अनुभव, कार्बन मुक्त भविष्यासाठी योगदान देण्याच्या वैयक्तिक प्रयत्नांना लक्षात घेऊन केली आहे. तसेच, कंपनीला विश्वास आहे की Hero Eddy आराम आणि सुविधा देताना एक आदर्श पर्यायी गतिशीलता पर्याय बनवेल, असे नवीन मुंजाल यांनी सांगितले. 

लुधियानामधील प्लांटमध्ये स्कूटरचे उत्पादनहिरो इलेक्ट्रिक आपल्या लुधियाना येथील प्लांटमध्ये त्याच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन करत आहे. लॉन्च झाल्यानंतर, येथून ही इलेक्ट्रिक स्कूटर देशभरात आणली जाईल.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर