जीएसटी कपातीचा फायदा वाहन खरेदी करणाऱ्यांनाच नाही तर शेतकऱ्यांना देखील होणार आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तसेच स्पेअर पार्ट, टायर आदींवरही जीएसटी कपात करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर घेतल्यावर किती पैसे वाचणार आहेत, त्यातून शेतकरी आणखी काहीतरी उपकरणे घेऊ शकणार आहे.
सर्वाधिक खपाच्या महिंद्रा ट्रॅक्टरवर ४० ते ९० हजारांनी जीएसटी कमी होणार आहे. महिंद्रा कंपनी महिन्याला 35,000-40,000 युनिट ट्रॅक्टर विकते. या ट्रॅक्टरची किंमत ३.०९ लाख ते १४.८३ लाख रुपये आहे. तर सोनालिका ट्रॅक्टरवर ५० ते ९५ हजार रुपयांचा फायदा होणार आहे. सोनालिकाच्या ट्रॅक्टरची किंमत २.७६ लाख रुपयांपासून १७.९९ लाख रुपयांपर्यंत जाते. इंजिनच्या क्षमतेनुसार हा जीएसटी कमी होणार आहे.
तिसरी कंपनी जॉन डिअरच्या ट्रॅक्टरवर देखील 40 हजारांपासून ते 1.54 हजारापर्यंत जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे. कुबोटा कंपनीच्या ट्रॅक्टरची किंमत ४० ते ९० हजार रुपयांनी कमी होणार आहे. आयशर ट्रॅक्टर्सची किंमत देखील ४० ते ७० हजारांनी कमी होणार आहे.