शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

जबरदस्त रेन्ज अन् झटपट चार्जिंग! फक्त ₹16 हजारात लॉन्च झाली ही इलेक्ट्रिक सायकल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 10:27 IST

या सायकलींना 'Alpha A' आणि 'Alpha I' अशी नावे देण्यात आली आहेत. ही सायकल पारंपरिक आणि इलेक्ट्रिक सायकलमधील गॅप भरून काढण्यास मदत करेल, असादावा कंपनीने केला आहे.

देशातील एक मुख्य इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी असलेल्या वर्टस मोटर्सने (Virtus Motors) अपल्या इलेक्ट्रिक सायकलचे नवी Alpha सीरीज लॉन्च केली आहे. यात दोन इलेक्ट्रिक सायकलचा समावेश करण्यात आला आहे. या सायकलींना 'Alpha A' आणि 'Alpha I' अशी नावे देण्यात आली आहेत. ही सायकल पारंपरिक आणि इलेक्ट्रिक सायकलमधील गॅप भरून काढण्यास मदत करेल, असादावा कंपनीने केला आहे.

Alpha सीरीजमध्ये काय आहे खास? -या दोन्ही इलेक्ट्रिक सायकलला 8.0 Ah क्षमतेचा फिक्स्ड बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हिच्या समोरच्या बाजूला डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. तसेच, हिचे सिंगल-स्पीड डिझाइन कुठल्याही प्रकारच्या रोडवर चांगली राइड देते, असा दावाही कंपनीने केला आहे. याच बरोबर, या सायकलला बरेच यूजर फ्रेंडली फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. जे हिला आणखी उत्कृष्ट बनवतात. या सायकलला 1 इंचाचे LCD स्क्रीनही देण्यात आले आहे. जे थ्रोटल जवळ लावण्यात आले आहे. यावर रियल टाइम इंफॉर्मेशन मिळते.

बॅटरी आणि परफॉर्मन्स - या इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने 36V 8AH च्या बॅटरी पॅकसह 250W क्षमतेची इलेक्ट्रिक हब मोटर देण्यात आली आहे. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, ही सायकल 30 किमी पर्यंत चालते. तसेच पॅडल सपोर्टसह हिची रेन्ज वाढून 60 किमीपर्यंत जाते. या सायकलची टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आणि हिचे वजन केवळ 20 किलोग्रॅम एवढे आहे. या सायकलला ट्यूब टायर, पुढच्या आणि मागच्या बाजूला डिस्क ब्रेक्स, MTB फ्रेम आणि इनबिल्ट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हिच्या डिस्प्लेवर बॅटरी लेव्हल, ऑडोमीटर, स्पीडोमीटरसारखी माहिती मिळते.

किंमत आणि व्हेरिअंट्स -कंपनीने ही सायकल आपल्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त लॉन्च केली आहे. यामुळे ती विशेष किंमतीत दिली जात आहे. हिची मूळ किंमत 24,999 रुपये एवढी आहे. मात्र, सुरुवातीच्या 50 ग्राहकांना ही सायकल केवळ 15,999 रुपयांना मिळेल. यानतंर, पुढील 100 ग्राहकांसाठी 17,999 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. तसेच, स्पेशल डिस्काउंटदरम्यान ही सायकल 19,999 रुपयांना मिळेल. ही सायकल दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात ग्रे आणि ब्ल्यू कलरचा समावेश आहे. ही सायकल कंपनीच्या आधिकृत वेबसाइटवरून बूक केली जाऊ शकते. 

टॅग्स :Automobileवाहन