शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मायलेजच्या बाबतीत भारी, किंमतीच्या बाबतीत लै भारी; पाहा स्वस्त आणि मस्त बजेट फ्रेंडली बाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:48 IST

अनेकांचा कल सध्या स्वस्त आणि अधिक मायलेज देणाऱ्या गाड्यांकडे आहे. पाहूया अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या.

भारतीय बाजारपेठेतील स्वस्त मोटरसायकलची मागणी सातत्यानं वाढतानाच दिसत आहे. इलेक्ट्रीक टू व्हीलरची संख्या वाढत असली तरी लोक अजूनही कम्युटर बाईक्स खरेदी करत आहेत. Hero पासून Bajaj आणि TVS पर्यंत या कंपन्या सर्वसामान्यांना परवडतील अशा बाईक्सचीही विक्री करतात. आज आपण अशा बाईक्स पाहू ज्याची किंमत ६० हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.

1. Hero HF DeluxeHero HF Deluxe ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाइक्सपैकी एक आहे. या बाईकची किंमत 54,650 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. या बाइकमध्ये 97.2 cc इंजिन देण्यात आलं असून ते 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने त्याचे डिझाइन अगदी सोपं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याला पुढील आणि मागील बाजूस 130mm ड्रम ब्रेक मिळतात. HF Deluxe बाईकचे वजन 112 किलो आहे आणि तिची फ्युअल टँक क्षमता 9.6 लिटर आहे. ही बाईक 65 किमी/लि पर्यंत मायलेज देते.

2. Bajaj Platina 100बजाज प्लॅटिना 100 ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या 100 सीसी बाईकपैकी एक आहे. त्याची किंमत 54,650 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. यामध्ये सेल्फ-स्टार्ट फीचर, मोठी सीट आणि बेस्ट इन क्लास मायलेज मिळते. बाईकमध्ये 7.79 bhp पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क जनरेट करणारे इंजिन देण्यात आलंय. फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक्ससोबत, बजाज प्लॅटिना कंबाईन ब्रेकिंग सिस्टमसह येते. बाईकचे वजन 119 किलोग्रॅम आहे आणि यात 11 लिटरचा फ्युअल टँक देण्यात आलाय. ही बाईक 75 किमी/लि पर्यंत मायलेज देते.

3. TVS Sportही देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाइक्सपैकी ही एक आहे. त्याची किंमत 59,130 ​​रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. ही बाईक 2 व्हेरिअंट आणि 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. TVS Sports मध्ये 109.7cc इंजिन देण्यात आलंय जे 8.18 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. TVS स्पोर्टला पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतात. या स्पोर्ट बाईकचे वजन 112 किलो आहे आणि त्यात 10 लिटरचं फ्युअल टँक देण्यात आलेय. ही बाईक 75 किमी/लि पर्यंत मायलेज देते.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलhero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईक