शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

Petrol Diesel Price cut: 1 डिसेंबरपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमती १४ रुपयांनी घसरणार? कंपन्या फायद्यात आल्या... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 12:19 IST

Fuel Price cut: काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोलवर नफा मिळण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते, परंतू डिझेलवर प्रति लीटरमागे ४ रुपयांचा तोटा होत असल्याचे म्हटले होते.

कच्च्या तेलाच्या किंमती कमालीच्या घसरल्या आहेत. यामुळे येत्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किंमतींत १४ रुपयांची घट होऊ शकते. कच्च्या तेलाच्या किंमती जानेवारीपासूनच्या सर्वात कमी पातळीवर आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल ८१ डॉलर प्रति बॅरलवर आले असून अमेरिकी क्रूड ऑईल ७४ डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. 

या घसरणीमुळे भारतीय रिफायनरींसाठी कच्च्या तेलाची किंमत सरासरी ८२ डॉलरवर आली आहे. मार्चमध्ये हाच दर 112.8 डॉलर होता. या प्रमाणे गेल्या ८ महिन्यांत कच्च्या तेलाचे दर ३१ डॉलर्स म्हणजेच २७ टकक्यांनी कमी झाले आहेत. एसएमसी ग्लोबलनुसार कच्च्या तेलाच्या किंमतीत १ डॉलरने घट झाली तर रिफायनरींना प्रति लीटरमागे ४५ पैशांची बचत होते. या हिशेबाने पेट्रोलडिझेलचे दर १४ रुपयांनी कमी व्हायला हवेत. ही कपात एकाचवेळी होण्याची अपेक्षा नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या किमतींनुसार, कच्च्या तेलाची भारतीय बास्केट प्रति बॅरल सुमारे $85 असायला हवी होती, परंतु ती $82 च्या आसपास आली आहे. या किंमतीनुसार रिफायनरी कंपन्यांचे प्रति बॅरल (159 लीटर) शुद्धीकरणावर सुमारे 245 रुपये वाचत आहेत. काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्र्यांनी पेट्रोलवर नफा मिळण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले होते, परंतू डिझेलवर प्रति लीटरमागे ४ रुपयांचा तोटा होत असल्याचे म्हटले होते. परंतू, आताच्या दरानुसार डिझेलही फायद्यात आल्याचे दिसत आहे. कारण तेव्हापासून कच्चे तेल १० टक्क्यांनी घसरले आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्कीच कमी होतील, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. तेल आयातीपासून शुद्धीकरणापर्यंतचे चक्र ३० दिवसांचे असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती कमी झाल्यानंतर एक महिन्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलFuel Hikeइंधन दरवाढ