शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:35 IST

या यादीत मारुती सुझुकी, टाटा आणि रेनो या कंपन्यांच्या कारचा समावेश होतो...

एखादी नवी कार खरेदी करताना ग्राहक लूक आणि फीचर्ससोबतच बजेटलाही महत्त्व देत असतात. महागडी कार घेणे सर्वांनाच शक्य नसते, अशा वेळी कमी किमतीत दमदार फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय वाहन बाजारात ५ लाख रुपयांच्या आत काही जबरदस्त पर्याय आहेत. या यादीत मारुती सुझुकी, टाटा आणि रेनो या कंपन्यांच्या कारचा समावेश होतो.

मारुति सुजुकी सेलेरियो -मारुती सुझुकी सेलेरियोची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ४.६९ लाख रुपये एवढी आहे. ही कार चांगल्या मायलेजसाठी ओळखली जाते. या कारला १.० लीटर पेट्रोल इंजिन असून सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. दुसरी कार म्हणजे, मारुती एस-प्रेसो, हिची एक्सशोरूम किंमत ३.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. ही सध्याची सर्वात स्वस्त कार आहे. या कारला ५-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.ऑल्टो K10 -याशिवाय, लोकप्रिय ऑल्टो K10 ही देखील एक कार आहे. हिची एक्स शोरूम किंमत ३.६९ लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. या कारला K10C १.०-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ६३ bhp आणि ८९ Nm टॉर्क जनरेट करते. हे ५-स्पीड ट्रान्समिशनसोबत जोडण्यात आले आहे.

टाटा टियागो -कमी बजेटमध्ये प्रीमियम हॅचबॅकचा अनुभव हवा असल्यास टाटा टियागो हा एक उत्तम पर्याय आहे. या कारची एक्सशोरूम किंमत ४.५९ लाख रुपए एवढी आहे. सुरुवातीच्या किमतीत मिळणाऱ्या या कारमध्ये १.२ लीटर इंजिन असून ती मॅन्युअल आणि एएमटी अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. 

एसयूव्हीसारखा लूक आवडणाऱ्यांसाठी रेनो क्विड -याशिवाय, एसयूव्हीसारखा लूक आवडणाऱ्यांसाठी रेनो क्विड हा देखील एक उत्तम पर्याय आहे. हीची एक्सशोरूम किंमत ४.२९ लाख रुपये एवढी आहे. यात १.० लीटर इंजिन देण्यात आले असून ते ६७ bhp पॉवर जनरेट करते. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी हे पाचही पर्याय उत्म मानले जातात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Top 5 Affordable Cars in India Under 5 Lakhs

Web Summary : Looking for budget-friendly cars? India offers options like Maruti Suzuki Celerio, Alto K10, Tata Tiago, and Renault Kwid under ₹5 lakhs. These cars offer good mileage and essential features, making them ideal for first-time buyers.
टॅग्स :AutomobileवाहनMarutiमारुतीTataटाटाRenaultरेनॉल्ट