शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Ford Exit Story: फोर्डने तीन महिन्यांपासूनच तयारी केलेली; कर्मचारी 'भुलले', फसले, अडकले

By हेमंत बावकर | Updated: September 10, 2021 12:47 IST

Black Shadow After Ford exit, stopping production of cars in India: फोर्डने फ्रिस्टाईल, फिगो, अस्पायर, ईकोस्पोर्ट, एंडेव्हर या कारचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू या कारची उत्पादने आधीच थांबविण्यात आली होती, असे फोर्डच्या कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर समोर आले आहे.

- हेमंत बावकर

What next After Ford stopped production in India: जगातील सर्वात मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या फोर्डने भारतातून काल एक्झिट (Ford exit) करण्याचा निर्णय घेतला. वाहनांची कमी विक्री, कोरोना काळ यामुळे कंपनी मेटाकुटीला आली होती. फोर्डचे भारतात दोन प्लांट होते. त्यापैकी एक प्लांट देण्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून होती. परंतू दोन्ही प्लँट बंद करण्याची तयारी कंपनीने त्या आधीपासूनच केली होती. यामुळे आधीच बदनाम झालेल्या फोर्डवर विश्वास ठेवून कार घेणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने या कार मालकांना सर्वप्रकराची सेवा देण्याचे आश्वासन दिलेले असले तरीदेखील जनरल मोटर्सनंतर फोर्डचे जाणे धक्कादायक आहे. आता फक्त फोर्डकडे 1000 कार उरल्या आहेत. (What will be happened with Ford Employees, Showroom, Service center's car owner's? nothing said yet.)

फोर्डने फ्रिस्टाईल, फिगो, अस्पायर, ईकोस्पोर्ट, एंडेव्हर या कारचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू या कारची उत्पादने आधीच थांबविण्यात आली होती, असे फोर्डच्या कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर समोर आले आहे. फोर्डने डिझेल मॉडेलचे उत्पादन तीन महिने आधीच थांबविले होते. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून डीलर बहुतांश गाड्या या पेट्रोल मॉडेलच्याच विकत होते. अस्पायर सीएनजी, इकोस्पोर्टचे फेसलिफ्ट येणार असल्याच्या बातम्या पसरविल्या जात होत्या. यामुळे कंपनी नवीन तंत्रज्ञान, फीचरच्या गाड्या लाँच करेल आणि ग्रीप मिळेल याच भ्रमात फोर्डचे कर्मचारी देखील राहिले होते. परंतू कालच्या घोषणेने त्यांच्या पायाखालची वाळूच घसरली आहे. काहींनी प्लाँट बंद होणार या तत्कालीन अफवांमुळे आधीच दुसरीकडे नोकरी पत्करली होती. परंतू, अनेकजण डीलर आणि कंपनी यांच्यावर विश्वास असल्याने तिथेच राहिले होते. आता त्यांच्या डोक्यात हजारो प्रश्न पडू लागले आहेत. या कर्मचाऱ्य़ांना कंपनी, डीलर वाऱ्यावर सोडणार नाही, काहीतरी करेल अशी आशा आहे. 

वाहन मालकांना त्यांच्या वाहनांची चिंता सतावत आहे. छोट्या छोट्या शहरांत उघडलेली सर्व्हिस सेंटर बंद केली तर सर्व्हिससाठी मोठ्या शहरांत जाण्याच भुर्दंड, महागडे स्पेअरपार्ट, लुबाडणूक आदी गोष्टी परतण्याची भीती त्यांना वाटत आहे. तर दुसरीकडे आधीच कारची रिसेल व्हॅल्यू कमी होती, आता तर कोणी घेणारपण नाही यामुळे विक्री करण्याचा विचारही ते करू शकत नाहीत अशा द्विधा मनस्थितीत ते आहेत. सोशल मीडियावर अशा ग्राहकांच्या शंका कुशंका व्यक्त होत आहेत. 

डीलरशीप बंद होणार, सर्व्हिस सेंटर सुरु राहणारकार विक्रीसाठीच नसल्याने डीलरशीप बंद होणार आहेत. तर त्यांची सर्व्हिस सेंटर सुरु राहणार आहेत. मस्तंग, एंडोव्हर इम्पोर्ट होणार असल्याने या कारचा जिथे सेल होता, तेथील आणि महत्वाच्या शहरांतील डीलरशीप सुरु राहतील. परंतू छोट्या कार आता यापुढे मिळणार नाहीत. तसेच जी सर्विहस सेंटर तोट्यात होती, ती देखील बंद होण्याची शक्यता आहे किंवा ती स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे. 

कर्मचाऱ्यांना दुसरीकडे ऑफर पण कमी पगारातफोर्डच्या कर्मचाऱ्यांना अन्य कंपन्यांच्या सर्विहस सेंटर किंवा शोरुममध्ये नोकरी देण्याची ऑफर मिळत आहे. परंतू ही ऑफर फोर्डमध्ये होता त्यापेक्षा निम्म्या पगाराची आहे. एकीकडे नोकरी गेली तर काय असा प्रश्न असताना दुसरीकडे कमी पगारात काम कसे परवडेल असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे. कंपनीने अद्याप कर्मचारी, डीलर यांना विश्वासात घेतलेले नाही. या निर्णयाची सारे वाट पाहत आहेत. 

टॅग्स :Fordफोर्ड