शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

थारसारख्या या SUV ला मिळतेय जबरदस्त बुकिंग, कॅन्सल केल्यास कंपनीच देतेय दोन लाख रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 19:11 IST

आजकाल सर्वच कार निर्मात्य़ा कंपन्यांना असे वाटत असते की त्यांच्या कारला बुकिंगवर बुकिंग मिळाव्यात. पण एका कंपनीवर अशी वेळ आली आहे की...

आजकाल सर्वच कार निर्मात्य़ा कंपन्यांना असे वाटत असते की त्यांच्या कारला बुकिंगवर बुकिंग मिळाव्यात. पण एका कंपनीवर अशी वेळ आली आहे की त्यांच्या एसयुव्हीला एवढी बुकिंग मिळालीय की ती कॅन्सल करणाऱ्या ग्राहकांना ही कंपनी आपल्या पदरचे दोन लाख रुपये देत आहे. 

भारतातून सोडून गेलेल्या फोर्ड कंपनीवर ही वेळ आली आहे. फोर्डने २०२१ मध्ये नवीन एसयुव्ही ब्राँको लाँच केली होती. या एसयुव्हीने बाजारात येताच धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली होती. आता या 'थार'सारख्या दिसणाऱ्या कारला एवढी बुकिंग मिळाली आहेत कंपनी ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नाहीय. यामुळे जे ग्राहक Bronco ची बुकिंग रद्द करून दुसरे मॉडेल बुक करतील त्यांना कंपनीने दोन लाख रुपयांचा डिस्काऊंट जारी केला आहे. 

ग्लोबल मीडिया कार्स डायरेक्टच्या रिपोर्टनुसार फोर्ड ब्रोंकोच्या ग्राहकांना ती रद्द करून दुसरी कार बुक करण्यासाठी दोन लाखांची सूट देत आहे. डीलरना याबाबतचे मेल पाठविण्यात आले आहेत. ही सूट २५०० डॉलर्स एवढी आहे. 3 एप्रिलपूर्वी जे ब्रोंको बुक करणारे ग्राहक दुसरी वाहने बुक करतील त्यांच्यासाठी ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे. 

कार आणि ड्रायव्हरच्या अहवालानुसार, फोर्डचे म्हणणे आहे की पुरवठा-साखळी अचानक एक मोठे आव्हान बनले आहे. पुरवठ्यातील अडचणींमुळे, या SUV वर ऑफर केलेली काही फिचर्स दिली जाऊ शकत नाहीएत. यामध्ये Sasquatch, Luxe Package आणि Molded in Color Hard Top आदींचा समावेश आहे. या एसयूव्हीचे बुकिंग रद्द करून दुसऱ्या मॉडेलवर जाण्यासाठी ग्राहकांना कंपनीने ऑफर जारी केली आहे. कंपनीच्या या डीलमध्ये Escape, Bronco Sport, Edge, Explorer, Expedition, Ranger आणि F-150 मॉडेल्सचा समावेश आहे. म्हणजेच ग्राहकांना यापैकी एक मॉडेल निवडावे लागणार आहे.  

टॅग्स :Fordफोर्ड