शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भारत एनकॅपची पहिली क्रॅश टेस्ट रेटिंग आली! या दोन कारना फाईव्ह स्टार मिळाले; गडकरींनी प्रमाणपत्र दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 11:23 IST

Bharat Ncap Safety Rating: यापुढे ग्लोबल एनकॅपमध्ये भारतीय कारची सेफ्टी टेस्ट केली जाणार नाहीय. यामुळे BNCAP वरच कंपन्यांना आणि ग्राहकांना अवलंबून रहावे लागणार आहे.  

Bharat Ncap Safety Rating ( Marathi News ) काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या भारत एनकॅपची पहिली रेटिंग आली आहे. यामध्ये टाटाच्या दोन दणकट एसयुव्हींचा नंबर लागला आहे. ग्राहकांना सर्व्हिस देण्यामध्ये मागे असलेल्या टाटा मोटर्सने सेफ्टी रेटिंगमध्ये बाजी मारली आहे. यापुढे ग्लोबल एनकॅपमध्ये भारतीय कारची सेफ्टी टेस्ट केली जाणार नाहीय. यामुळे BNCAP वरच कंपन्यांना आणि ग्राहकांना अवलंबून रहावे लागणार आहे.  

टाटाच्या सफारी आणि हॅरिअरला भारत एनकॅपमध्ये (Bharat NCAP) फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. अशाप्रकारे बीएनकॅपमध्ये या दोन पहिल्या फाईव्ह स्टार मिळालेल्या कार ठरल्या आहेत. भारतात सेफ्टी कारची यादी मोठी मोठी होत चालली होती. परंतू, मारुती सुझुकी, टोयोटा यासारख्या कंपन्या काही दूरदूरपर्यंत दिसत नव्हत्या. या कंपन्यांच्या बहुतांश कारना ग्लोबल एनकॅपमध्ये झिरो स्टार रेटिंग किंवा कमी रेटिंग मिळाली होती. यामुळे Bharat NCAP मध्ये या कंपन्यांच्या कार कसा परफॉर्मन्स दाखवितात याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. 

टाटा सफारी आणि हॅरियरला प्रौढ सुरक्षेमध्ये 32 पैकी 30.08 गुण मिळाले आहेत आणि मुलांच्या सुरक्षेत 49 पैकी 44.54 गुण मिळाले आहेत. या दोन्ही SUV मध्ये अधिकाधिक 7 एअरबॅग आहेत. ज्यामध्ये त्याच्या सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग उपलब्ध आहेत. 

या दोन एसयुव्हींना फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्वत: नितीन गडकरींनी याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करून माहिती दिली आहे. 

टाटाला सर्व्हिसमध्ये सुधारणा करण्याची गरजटाटाने फक्त ट्रकच बनवावेत असे एकेकाळी बोलले जात होते. परंतू, टाटाने गेल्या काही वर्षांत एक परदेशी कंपनी विकत घेतली आणि त्याचा फायदा देशातील पॅसेंजर कार उद्योगासाठी करून घेतला आहे. यामुळे टाटाने बिल्ड क्लालिटी चांगली दिली आहे. असे असले तरी टाटाला सर्व्हिस काही सुधारता आलेली नाही. इतर कंपन्यांच्या तुलनेत टाटाच्या अनेक ग्राहकांना टाटाच्या वाईट सर्व्हिसचा अनुभव आलेला आहे. सोशल मीडियावर अनेक ग्राहक याच्या तक्रारी करत असतात. सेलमध्ये टाटा आता दोन नंबरवर आलेली आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीTataटाटा