शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आवडती चारचाकी महागणार; ई-वाहनांसह पेट्राेल-डिझेल कारच्या किमती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 06:55 IST

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किमती ७ ते १० टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त ईव्हींना प्रोत्साहित करण्याच्या मोहिमेस धक्का लागण्याची शक्यता आहे.

मुंबई : ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर या महिन्यांमध्ये वाहनविक्रीचा टाॅप गिअर दिसला. मात्र, नव्या वर्षात हा वेग मंदावण्याची शक्यता आहे. लाेकांच्या पसंतीस उतरणाऱ्या ई-वाहनांसाेबतच पारंपरिक खनिज इंधनावर धावणाऱ्या वाहनांच्या किमतीत वाढ हाेणार आहे. सर्वच कार कंपन्यांनी जानेवारीपासून किमती वाढविण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे किमती वाढण्यापूर्वी ग्राहकांचा डिसेंबरमध्येच आवडती गाडी घेण्याकडे कल दिसू शकताे. 

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किमती ७ ते १० टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वस्त ईव्हींना प्रोत्साहित करण्याच्या मोहिमेस धक्का लागण्याची शक्यता आहे. ईव्हीच्या उत्पादनामध्ये बॅटरीचा खर्च ४० ते ५० टक्के असतो. बॅटरी म्हणजे ई-वाहनांचे हृदयच. बॅटरी महाग झाल्यामुळे या गाड्यांसाठी जास्त पैसे माेजावे लागणार आहेत. यावर्षी सर्व प्रकारच्या ई-वाहनांच्या विक्रीत ८०० टक्के वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेल कारही महागणारमारुती-सुझुकी, टाटा मोटर्स, एमजी मोटर, किया, रेनो, मर्सिडीज-बेंज आणि ऑडी यांसारख्या कंपन्यांच्या सर्व कारच्या किमती जानेवारीपासून १.७ ते १५ टक्क्यांनी वाढणार आहेत.

किमतीत किती फरक पडणार? बॅटरीच्या किमती वाढल्या आहेत. यंदा जगभरात लिथियम आयन बॅटरी पॅकच्या किमती सरासरी ७ टक्के महागल्या आहेत. भारतात मात्र बॅटरीच्या किमती तब्बल ५० ते ६० टक्के वाढल्या आहेत. गेल्या वर्षी ११,७०० ते १२,९०० रुपये प्रतिकिलोवॅट तासपर्यंत मिळणाऱ्या बॅटरी आता १४,८०० ते १८,९०० रुपयांवर गेल्या आहेत.

बॅटऱ्यांची कठाेर चाचणी हाेणारईव्हीमध्ये आग लागण्याच्या घटनांमुळे सरकारने बॅटरीसंबंधी नियम कडक केले आहेत. डिसेंबरपासून बॅटरींच्या चाचणीसाठी ‘एआयएस १५६’ मानक लागू होईल. बॅटरी उत्पादनात वापरली जाणारी खनिजेही महागली आहेत. 

ही आहेत कारणेलिथियम, कोबाल्ट, निकेल आदी खनिजे महागली आहेत.चीनमधील लॉकडाऊनमुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे.देशात बॅटरी परीक्षणाचे नियम कठोर झाले आहेत.बॅटरीत वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक्स महागले आहे.

कार आणि दुचाकी वाहन विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. मात्र, आता या त्रासापासून पुन्हा एकदा दीर्घ मुदतीचा वाहन विमा आणण्याची शक्यता आहे. विमा नियामक ‘इरडा’ने कारसाठी ३ तर दुचाकींसाठी पाच वर्षांच्या विम्याचा प्रस्ताव दिला आहे. अशा प्रकारचा नियम २०१८ मध्ये आणला हाेता. मात्र, काेराेना काळात ताे मागे घेण्यात आला हाेता.

टॅग्स :carकार