शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

२ तासांत वेगवान चार्जिंग अन् २५० किमी धावणार; ज्युपिटरनं लॉन्च केल्या २ CEV कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 13:01 IST

सेंटर फॉर एनर्जी फायनान्स (सीईईडब्ल्यू-सीईएफ) अभ्यासानुसार, भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बाजारपेठ 2025 पर्यंत रू. 50,000 कोटींपर्यंत पोहोचेल. 

नवी दिल्ली - ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडनं व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन सेक्टरमध्ये ई-एलसीव्ही २.२ जेईएम तेझ आणि ७ टन जीव्हीडब्ल्यूच्या ईव्ही स्टार सीसीचं ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अनावरण करून इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ज्युपिटरनं कॅनेडियन सीईव्ही कंपनी ग्रीनपॉवरसह भागीदारी केली आहे. जेईएमनं ईएलसीव्हीचे २ व्हेरिएंट बाजारात आणले असून ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी प्रमुख बाजारपेठांमध्ये सेवा सुविधा स्थापन करण्याचीही योजना आखली आहे. 

दळणवळण वाहतूक व्यवसायातील आपली विद्यमान क्षमता आणि कौशल्य वाढवत जेईएम’ने प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक बाजारपेठेतील व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रवेश केला आहे. त्यासाठी खास असलेल्या उत्तर अमेरिकेतील ग्रीनपॉवर मोटर कंपनीशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. ईव्ही बॅटरीजसाठी लॉग 9 मटेरिअल्स, वाहन डिझाईन आणि विकासासाठी Xavion मोबिलिटी सोबतची धोरणात्मक भागीदारी हे एक स्पर्धात्मक उत्पादन तयार करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल असं बोललं जात आहे. 

जेईएम तेझची खास वैशिष्टे

एका चार्जमध्ये 180 किमीपर्यंत प्रमाणित अंतर पार करणे शक्य 23 % पर्यंतची श्रेणीक्षमता, उच्च कार्यक्षमतेची पॉवरट्रेन, उच्च व्होल्टेज स्थापत्य, अग्रगण्य एलटीओ/एलएफपी बॅटरी   झटपट चार्ज होणारी एलटीओ रसायन आधारीत बॅटरी, 10 +वर्षांचे बॅटरी जीवन आणि 6 वर्षांपर्यंत रू. 2 लाखांचा बायबॅक चार्ज होणारी लिक्विड कूल एलएफपी रसायन आधारित बॅटरी सोबत 5 वर्षांची वॉरंटी लाईव्ह ट्रॅकिंगकरिता टेलिमॅटीक्स, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट,  

ईव्ही स्टार सीसीची खास वैशिष्टे एका चार्जमध्ये 250 किमीपर्यंत प्रमाणित अंतर पार करणे शक्य 22 % पर्यंतची श्रेणीक्षमता, उद्देशसहीत विकसीत बहु उपयोगिता इलेक्ट्रिक वाहन अत्याधुनिक एलएफपी लिक्विड कूल्ड बॅटरी पॅक सोबत दोन आकार पर्याय, एलएफपी विकसीत बॅटरी आणि सर्वोत्तम ग्रॅव्हीमेट्रीक आणि व्हॉल्यूमेट्रीक एनर्जी डेनसीटीज गाठण्याच्या दृष्टीने बांधलेले किमान 2500 चक्रांपर्यंत पुरेल अशा स्वरूपाचे बॅटरी डिझाईन डीसी वेगवान चार्जिंग आणि एसी संथ गती चार्जिंगयुक्त 

परिमाण

जेईएम तेझ

ईव्ही स्टार सीसी

ढाचा

ग्राउंड क्लिअरन्स

150 एमएम

180 एमएम

वजन आणि कामगिरी

एकूण वाहन वजन

2.2 टन

7 टन

पेलोड

1 टन

4 टन

3.5 टन

बॅटरी आणि मोटर कामगिरी

बॅटरी ऊर्जा क्षमता

14केडब्ल्यूएच

28 केडब्ल्यूएच

62.5 केडब्ल्यूएच

118 केडब्ल्यूएच

किमान व्होल्टेज

300+ व्होल्ट

600 व्ही डीसी

ट्रॅक्शन मोटर

40kW/80केडब्ल्यू

40kW/80केडब्ल्यू

150केडब्ल्यू

कमाल टॉर्क

>2100 एनएम

1200 एनएम

एका चार्जमध्ये पार करता येण्याजोगे अंतर

100 किमी

180 किमी

150 किमी

250 किमी

पर्याय

सामान्य आणि वेगवान

एकल ड्राईव्ह

चार्जिंग

वेगवान चार्जिंग वेळ

20 मिनिटे

2 तास

60 मिनिटे

2 तास

नियमित चार्जिंग वेळ

20 मिनिटे

2 तास

120 मिनिटे

11 तास

 

याबाबत ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड’चे ​​व्यवस्थापकीय संचालक विवेक लोहिया म्हणाले की, पर्यावरणासाठी स्वच्छ पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनं ही जागतिक स्तरावर बोलकी उदाहरणं ठरली आहेत आणि शाश्वत वाहतूक उद्दिष्टांच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आज जेईएम तेझ आणि ईव्ही स्टार सीसी लाँच करून आम्ही ज्युपिटर ग्रुप एका नव्या पर्वात प्रवेश करत आहोत. भारतात ईव्ही व्यवसायाची क्षमता मोठी आहे त्यामुळे आगामी भविष्यात एक महत्त्वाचा घटक होण्याची मोठी संधी दिसते आहे. ईव्ही किमतीचे फायदे आणि शाश्वत दृष्टिकोन पाहता, ईव्ही अखेरीस आयसीई बाजारपेठेचा ताबा घेतील. हरीत भविष्य (ग्रीन फ्यूचर) आणि अनुकूल धोरण समर्थन निर्माण करण्याची सरकारची दृष्टी या विभागाला आणखी चालना देणारी ठरेल असं त्यांनी सांगितले.   तर CEVS च्या व्यवसाय वाढीबद्दल अत्यंत आशावादी आहोत, मोबिलिटी सोल्यूशन श्रेणीतील आमचा वारसा लक्षात घेता, CEV विभागात प्रवेश करणे ही नैसर्गिक वाढीचा मार्ग होता. कंपनी आमच्या उत्पादन सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या आहेत आणि शाश्वततेच्या क्षेत्रात गेम चेंजर आहेत. भारतातील CEV व्यवसायात नामांकितांमध्ये एक असण्याची आकांक्षा बाळगतो असं ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी’चे सीईओ गौरव जलोटा यांनी म्हटलं. 

जबलपूर, इंदौर आणि कोलकाता येथे उत्पादन सुविधा असलेल्या कंपनीकडे कॅम्पस स्वरूपात 200 एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि वाहन घटकविषयक अभियांत्रिकीमध्ये कौशल्य आहे. तंत्रज्ञान-सक्षम प्रक्रिया आणि उच्च पात्र आणि कुशल कामगारांसह, जेईएम त्याच्या चांगल्या-संशोधित आणि मजबूत अभियांत्रिकी सीईव्ही उत्पादनांसाठी बाजारात एक फायदेशीर स्थान निर्माण करण्याच्या स्थितीत आहे. भविष्यात एलसीव्ही, एमसीव्ही, एचसीव्ही आणि बसचा इलेक्ट्रिक पर्यायातील संपूर्ण बंच मिळवण्याची कंपनीची योजना आहे. सेंटर फॉर एनर्जी फायनान्स (सीईईडब्ल्यू-सीईएफ) अभ्यासानुसार, भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) बाजारपेठ 2025 पर्यंत रू. 50,000 कोटींपर्यंत पोहोचेल.  

टॅग्स :auto expoऑटो एक्स्पो 2023