शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Electric Scooters : इलेक्ट्रीक स्कूटर्स लाँच करण्यावर खरंच सरकारनं बंदी घातली का? पाहा काय आहे सत्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:59 IST

गेल्या काही दिवसांमध्ये देशात इलेक्ट्रीक दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या.

गेल्या काही दिवसांमध्ये देशात इलेक्ट्रीक दुचाकींना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. यानंतर सरकारदेखील अॅक्शनमोडमध्ये आलं होतं आणि एक समितीही स्थापन करण्याचे निर्देश दिले होतं. परंतु त्यानंतर आता काही माध्यमांकडून सरकारन इलेक्ट्रीक दुचाकींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना नव्या गाड्या लाँच न करण्याचे निर्देश दिल्याचं सांगण्यात आलं होतं. सरकारनं आता यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सरकारनं अशाप्रकारचे कोणतेही आदेश दिले नसल्याचं स्पष्ट केलंय.

इलेक्ट्रीक दुचाकींमध्ये आग लागण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारनं उत्पादकांना नव्या इलेक्ट्रीक दुचाकी लाँच न करण्याचा, तसंच ज्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये आग लागल्याची घटना घडली नाही, त्यांनीदेखील नव्या दुचाकी लाँच न करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. यावर सरकारनं स्पष्टीकरण देत हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. ‘इलेक्ट्रीक दुचाकींना लागलेल्या आगीची चौकशी होईपर्यंत कोणत्याही कंपनीनं इलेक्ट्रीक दुचाकी लाँच करू नये असे आदेश सरकारनं दिल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. अशा प्रकारचे कोणतेही निर्देश सरकारकडून देण्यात आले नसून हे वृत्त दिशाभूल करणारं आणि निराधार आहे,’ असं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. सरकारनं ट्विटरच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलंय.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरGovernmentसरकार