शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सर्वांचा एकच प्रॉब्लेम! कारच्या काचेवरील फॉग काही जाईना; हा आहे रामबाण उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:10 IST

how to remove Fog Windshield: कारच्या काचांवर धूर बनण्याची समस्या एका मिनिटात दूर केली जाऊ शकते.

पावसाळा आला की कार, ट्रक, टेम्पो चालकांना एक त्रास नेहमी सतावत असतो, तो म्हणजे समोरील काचेवर धुके तयार होऊ लागते. एसी लावला तर बाहेरच्या बाजुने आणि एसी नाही लावला तर आतल्या बाजुने. अनेकजण अनेकप्रकारचे प्रयत्न करतात. काही जण सोशल मीडियावरही विचारतात, की काय करावे. या फॉगमुळे समोरचे काही दिसत नाही व यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. 

कारच्या काचांवर धूर बनण्याची समस्या एका मिनिटात दूर केली जाऊ शकते. जर आतून काचेवर धुके जमू लागले तर लगेचच एसी चालू करावा. जेव्हा वातावरणातील आर्द्रता खूप जास्त असते तेव्हा ही समस्या उद्भवते. यावेळी एखादा मऊ कापडाचा सुका फडका सोबत ठेवावा. तो स्वच्छ असेल तर हे धुके पुसता येते व काचेवर पाण्याचे डागही राहत नाहीत. 

जर खिडक्यांवर धुके जमले तर एसी व्हेंट्स तिकडे वळवा, जर समोरील काचेवर धुके जमले असेल तर काचेवर एसीचा फ्लो वाढवा. जेणेकरून ही थंड हवा काचेवरील धुके क्षणात घालवून टाकेल. तरीही काचेवर धुरकट दिसत असेल तर स्वच्छ कपडा घ्या आणि हाताचा काचेला स्पर्श न करता पुसा. यामुळे काच एकदम स्वच्छ होते व पुढील दिसायला लागते. 

बाहेरून फॉग जमा झाला तर काय...जर काचेवर बाहेरून फॉग जमा झाला तर काय करायचे, असा प्रश्न सतावत असेल तर कारचा एसी बंद करून ब्लोअर सुरु करावा. ही काच बाहेरील वातावरणापेक्षा जास्त थंड झाल्याने बाहेरून धुके पकडू लागली होती. ती गरम झाली की लगेचच हे धुके गायब होते. कारवरील धुके घालविण्याचे बाजारातही काही उपाय आहेत. एक विशिष्ट प्रकारचे लिक्विड मिळते, ते काचेवर लावून काच धुतल्याने फॉग जमत नाही. तसेच काचेवर पाणी न थांबून राहण्यासाठी देखील टूथपेस्ट, बटाटा आदी उपाय करता येतात. 

टॅग्स :carकारRainपाऊस