शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ईव्ही, हायड्रोजन ट्रक बनविणाऱ्या निकोलाचा संस्थापक गुंतवणूकदारांशी खोटे बोलला; 4 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 11:17 IST

मॅनहॅटन फेडरल कोर्टात यावर सुनावणी झाली होती. यावर सोमवारी निकाल सुनावण्यात आला. सरकारी वकिलांनी ११ वर्षांची शिक्षा देण्याची मागणी केलेली.

इलेक्ट्रीक आणि हायड्रोजनवर चालणारे ट्रक बनविणारी कंपनी निकोलाचे संस्थापवक ट्रेवर मिल्टन यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी मिल्टन हे गुंतवणूकदारांशी खोटे बोलले होते, त्या आरोपांखाली त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

निकोला यांनी सुरुवातीलाच पिकअप ट्रक बनविला होता, यामध्ये त्यांनी स्वत:ची बॅटरी विकसित केल्याचा दावा केला होता. परंतु, ही बॅटरी ते विकत घेत होते, हे त्यांना ज्ञात होते. तसेच त्यांनी निकोला वन हा सेमी ट्रक बनविला होता, त्याला यश मिळाले होते, असे गुंतवणूकदारांना सांगितले होते. परंतु, त्यांचा ट्रक काम करत नव्हता हे त्यांना माहिती होते. या दोन खोट्या दाव्यांवरून मिल्टन यांना चार वर्षांची शिक्षा झाली आहे. 

मॅनहॅटन फेडरल कोर्टात यावर सुनावणी झाली होती. यावर सोमवारी निकाल सुनावण्यात आला. कंपनीबद्दलची त्यांची विधाने खोटी आहेत हे त्यांना माहित आहे. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबासाठी हे ऐकणे जितके कठीण असेल तितकेच, मला विश्वास आहे की ज्युरी योग्य होती, असे निकाल देताना यूएस जिल्हा न्यायाधीश एडगर रामोस यांनी म्हटले. 

न्यायाधीशांनी मिल्टनला त्याच्या शिक्षेविरुद्ध अपील प्रलंबित ठेवत जामिनावर सोडण्याची परवानगी दिली. 41 वर्षीय मिल्टनला सुमारे 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. यासाठी त्यांनी थेरानोसच्या संस्थापक एलिझाबेथ होम्सच्या 2022 मधील फसवणूक प्रकरणाचा हवाला दिला होता. परंतु, न्यायाधीशांनी ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असल्याचे सांगत ही मागणी फेटाळली होती. 

मिल्टन य़ांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणालाही इजा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि माझ्यावर आरोप केलेले गुन्हे मी केलेले नाहीत. मला तुरुंगाऐवजी प्रोबेशन चांगले ठरेल कारण मला आजारी पत्नीची सेवा करता येईल, अशी विनंती मी न्यायाधीशांना केली होती, असे मिल्टन यांनी सांगितले. 

टॅग्स :Courtन्यायालयAmericaअमेरिका