शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Hero नं लाँच केली डबल बॅटरी, क्रुझ कंट्रोलसहित Electric Scooter; पाहा काय आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 15:30 IST

कंपनीनं Optima HX सिटी-स्पीड इलेक्ट्रीक स्कूटरचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे.

Electric Scooter In India: भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रीक दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या Hero Electric ने त्यांच्या Optima HX सिटी-स्पीड इलेक्ट्रीक स्कूटरचं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. नवीन Hero Electric Optima HX स्कूटर दोन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आली आहे आणि त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता यात क्रूझ कंट्रोल देखील देण्यात आलं आहे.

नवीन Hero Electric Optima HX स्कूटरला एक अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह क्रूझ कंट्रोल देण्यात आलंय. याद्वारे ते फीचर सुरू आहे किंवा नाही हे दिसून येतं. जर तुम्हाला क्रूझ कंट्रोल अॅक्टिव्ह करायचे असेल, तर तुम्हाला केवळ फक्त एक बटण प्रेस करावं लागेल आणि एकदा अॅक्टिव्हेट झाल्यावर ते इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिसेल. क्रूझ कंट्रोल काढून टाकण्यासाठी, रायडरला फक्त थ्रॉटल फिरवणे किंवा ब्रेक लावणे आवश्यक आहे.

किंमत आणि फीचर्सHero Electric Optima HX मध्ये 1.2 kW ची इलेक्ट्रीक मोटर देण्यात आली आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 42 kmph आहे आणि सिंगल चार्जवर ही स्कूटर 82 किमी पर्यंत जाऊ शकतो. ही स्कूटर दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. सबसिडीनंतर याच्या सिंगल बॅटरी व्हर्जनची किंमत 55,580 रुपये आणि डबल बॅटरी व्हर्जनची किंमत 65,640 रुपये एक्स शोरुम इतकी आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरचे एकूण वजन 72.5 किलो असून सध्या ती रेड, ग्रे, ब्ल्यू आणि व्हाईट या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड