काही महिन्यांपूर्वी चीनने ऑटोमोबाईल सेक्टरला लागणारे रेअर अर्थ मेटलच्या निर्यातीवर निर्बंध आणले होते. यामुळे अवघ्या जगाचा पुरवठा थांबला होता. यामुळे भारतीय कंपन्यांवर काम बंद ठेवायची वेळ आली होती. आता अमेरिकेनंतर भारतासाठी चीनने रेअर अर्थमेटलसाठी निर्बंध उठविले आहेत.
रेअर अर्थ मेटलसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्याच महिन्यात चीनचे समकक्ष वांग यी यांच्याशी चर्चा केली होती. आता ते भारताच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी यावर माहिती दिली आहे. चीनने खते, दुर्मिळ पृथ्वी चुंबकीय/खनिजे आणि टनेल बोरिंग मशीनच्या भारतावरील निर्यातीवरील निर्बंध उठवले आहेत, असे वृत्त ईटीने दिले आहे.
या विषयाशी संबंधीत लोकांनी चीनने या वस्तूंच्या शिपमेंट पाठविण्यास सुरुवात केली आहे. सध्या या गोष्टी ट्रान्सपोर्टमध्ये आहेत. रेअर अर्थ मॅग्नेटमध्ये निओडिमियम-लोह-बोरॉन यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ट्रॅक्शन मोटर आणि इलेक्ट्रिक वाहनं आणि पारंपारिक वाहनांमध्ये पॉवर स्टीअरिंग मोटरसाठी याचा वापर केला जातो.
भारतातील अनेक दुचाकी उत्पादक आता दुर्मिळ पृथ्वी चुंबकांना पर्याय शोधत आहेत. टीव्हीएसने देखील याला पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. ओला इलेक्ट्रिकने आधीच दुर्मिळ पृथ्वी चुंबकमुक्त तंत्रज्ञानाचा वापर करणारी मोटर डिझाइन केली आहे. आणि डिसेंबर तिमाहीपासून ही मोटर वाहनांमध्ये वापरण्यास सुरुवात करणार आहे.