शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कारपेक्षा जुन्या कार्सला मागणी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 05:17 IST

जुन्या (प्री-ओन्ड) कार्सची खरेदी-विक्री नवीन गाड्यांपेक्षाही अधिक होत आहे. या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल १ लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.

मुंबई : जुन्या (प्री-ओन्ड) कार्सची खरेदी-विक्री नवीन गाड्यांपेक्षाही अधिक होत आहे. या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल १ लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहे.२०१७-१८ मध्ये देशभरात ३६ लाख जुन्या गाड्यांची विक्री झाली. त्या वर्षात नवीन कार्सची विक्री मात्र ३२ लाखच होती. ३६ लाख गाड्यांमार्फत या क्षेत्रात ९० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. आता या आर्थिक वर्षात ही उलाढाल १ लाख कोटी रुपयांच्यावर जात आहे. वॅगन-आर, स्विफ्ट व सॅन्ट्रो या श्रेणीतील जुन्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. २०१७-१८ मध्ये ज्या ३६ लाख गाड्या विक्री झाल्या, त्यापैकी ६० टक्के गाड्या या तीन श्रेणीतील होत्या, असे या क्षेत्रातील व्यावसायिकांनी सांगितले.आता महिंद्रा, होंडा, मारुती सुझुकी, टोयोटा यासारख्या मोठ्या कंपन्याही जुन्या गाड्यांच्या विक्रीत उतरल्या आहेत. सर्वच मोठ्या कंपन्यांनी जुन्या गाड्यांच्या विक्रीसाठी स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. हे क्षेत्र दरवर्षी १० ते १५ टक्के वाढत आहे. पुढील तीन ते चार वर्षात सध्यापेक्षा दुप्पट जुन्या गाड्यांची विक्री होईल, असे मत डीलर्सने व्यक्त केले आहे.>विमा नवीन गाडीच्या तुलनेत असतो स्वस्तआपल्या घरी स्वत:ची चारचाकी असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण भरमसाठ वाहतूक कर व महागडा विमा यामुळे नवीन गाडी खरेदी करणे शक्य नसते. जुन्या गाड्यांची किंमत नवीन गाडीच्या तुलनेत जवळपास अर्धी असते. त्यामुळे त्यांचा विमा नवीन गाडीच्या तुलनेत स्वस्त असतो. कागदपत्रेही आधीच तयार असल्याने कर्ज सहाय्यसुद्धा तात्काळ मिळते. यामुळेच जुन्या गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :carकार