शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

Hero Xoom Scooter: खतरनाक! वळणावर कारसारख्या लाईट वळणार; हिरोची हाय-टेक स्कूटर झूम लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:52 IST

हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने आज नवीन ११० सीसी स्‍कूटर – झूम लाँच केली.

हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने आज नवीन ११० सीसी स्‍कूटर – झूम लाँच केली. हिरो झूममध्‍ये ११० सीसी श्रेणीमधील नवीन वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. इंडस्‍ट्री-फर्स्‍ट वैशिष्‍ट्य – हिरो इंटेलिजण्‍ट कॉर्नरिंग लाइट (एचआयसीएल) आणि सेगमेंट-फर्स्‍ट – अधिक मोठे व अधिक रूंद टायर्स, ११० सीसी विभागातील गतीशील अॅक्‍सेलरेशन देण्यात आले आहे. 

या स्कूटरमध्ये कारप्रमाणे वळणावर प्रकाश देणारे लाईट बसविण्यात आले आहेत. तसेच इंडल स्‍टॉप-स्‍टार्ट सिस्‍टम देण्यात आली आहे. नवीन डिजिटल स्‍पीडोमीटरसह ब्‍ल्‍यूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी व साइड-स्‍टॅण्‍ड इंजिन-कट-ऑफ देण्यात आले आहे. 

शीट ड्रम, कास्‍ट ड्रम व कास्‍ट डिस्‍क या तीन व्‍हेरिण्‍ट्समध्‍ये ही स्कूटर येते. या स्कूटरची किंमत 68,599 (एलएक्‍स - शीट ड्रम), 71,799 (व्‍हीएक्‍स - कास्‍ट ड्रम) आणि 76,699 (झेडएक्‍स – कास्‍ट ड्रम) एक्स शोरुम एवढी ठेवण्यात आली आहे. 

यामध्ये एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प, एलईडी टेल लॅम्‍प्‍स आणि इंडस्‍ट्री-फर्स्‍ट ‘एचआयसीएल – हिरो इंटेलिजण्‍ट कॉर्नरिंग लाइट’ असलेले पॅकेज देण्यात आले आहे. रूंद टायर्स, डायमंड कट अलॉई व्‍हील्‍स, इंटीग्रेअेड रिअर ग्रिप देण्यात आली आहे. 

पॉवर-पॅक कार्यक्षमता हिरो झूममध्‍ये ११० सीसी बीएस-६ प्रमाणित इंजिन आहे, जे उच्‍च कार्यक्षम राइडसाठी ७२५० आरपीएममध्‍ये ८.०५ बीएचपी आऊटपुट आणि ५७५० आरपीएममध्‍ये ८.७ एनएम टॉर्कची निर्मिती करते. 

हिरो झूम पाच स्‍पोर्टी कलरमध्ये येते. शीट ड्रम व्‍हेरिएण्‍ट पोलस्‍टार ब्‍ल्‍यूमध्‍ये उपलब्‍ध आहे, कास्‍ट ड्रम व्‍हेरिएण्‍ट पोलस्‍टार ब्‍लयू, ब्‍लॅक व पर्ल सिव्‍हलर व्‍हाइटमध्‍ये उपलब्‍ध आहे. कास्‍ट डिस्‍क व्‍हेरिएण्‍ट पोलस्‍टार ब्‍ल्‍यू, ब्‍लॅक, स्‍पोर्टस् रेड आणि मॅट अॅब्रॅक्‍स ऑरेंज कलर थीम्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्प