शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Coronavirus: लॉकडाऊनमध्ये टाटा मोटर्सकडून जगभरातील ग्राहकांना मोठी सवलत; मिळणार महत्त्वाचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 16:36 IST

तसेच राष्‍ट्रीय लॉकडाऊन कालावधीदरम्‍यान वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्‍ये दोन महिन्‍यांची वाढ केलेली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍यामुळे टाटा मोटर्सने जगभरातील आपल्‍या व्‍यावसायिक वाहन ग्राहकांसाठी वॉरंटीमध्‍ये वाढ केलेली आहे. कंपनी या आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये वाहने धावती ठेवण्‍याच्‍या उद्देशाने तंत्रज्ञान पाठिंबा देण्‍याकरिता त्‍यांच्‍या सर्वोत्तम क्षमतांनुसार देखील काम करत आहे. व्‍यावसायिक वाहन ग्राहकांसाठी सेवा विस्‍तारीकरणाचा भाग म्‍हणून टाटा मोटर्स भारतातील त्‍यांच्‍या ग्राहकांसाठी महत्त्वाचे फायदे देणार आहे. राष्‍ट्रीय लॉकडाऊन कालावधीदरम्‍यान नियोजित असलेल्‍या पूर्वीच्‍या मोफत सर्व्हिसेससाठी दोन महिन्‍यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राष्‍ट्रीय लॉकडाऊन कालावधीदरम्‍यान वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्‍ये दोन महिन्‍यांची वाढ केलेली आहे.मुदत संपणा-यांनाही टाटा मोटर्सनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून, टाटा सुरक्षा एएमसीमध्‍ये वाढ केलेली आहे, टाटा मोटर्स सुरक्षामधील सर्व सक्रिय करारांसाठी एक महिन्‍याची वैधता वाढवलेली आहे. नियोजित पूर्वीचे एएमसी सेवा लाभ मिळावे, या हेतूनं टाटा मोटर्सनं ग्राहकांकरिता एक महिन्‍याची मुदतवाढ दिलेली असून, सरकारने दिलेल्‍या आदेशानुसार आवश्‍यक वस्‍तूंची ने-आण करणा-या ट्रकांसाठी टाटा मोटर्स हेल्‍पलाइन, टाटा सपोर्ट - १८०० २०९ ७९७९ देखील सक्रियपणे सुरू राहणार आहेत. तसेच टाटा मोटर्स प्रमाणित वॉरंटी अटी व नियमांनुसार त्‍यांच्‍या जागतिक व्‍यावसायिक वाहन ग्राहकांच्‍या वॉरंटी कालावधीमध्‍ये देखील वाढ करणार आहे. दक्षिण आफ्रिका, आखाती देश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, वायव्‍य आफ्रिकन देश व लॅटॅम (लॅटिन अमेरिका) देशांमधील वाहनांवर १५ मार्च २०२० नंतर वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्‍ये दोन महिन्‍यांची वाढ करण्यात आली आहे.बांगलादेशमधील वाहनांवर २० मार्च २०२० नंतर वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी आणि श्रीलंकेमधील वाहनांवर १५ मार्च २०२० नंतर वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्‍ये दोन महिन्‍यांची वाढ केलेली आहे. टांझानिया, झांबिया, मोझांबिक, केनिया, युगांडा, झिम्बाब्वे, म्यानमार, मलेशिया, फिलीपाइन्‍स, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशियामधील वाहनांवर १ एप्रिल २०२० नंतर वॉरंटी संपणा-या ग्राहकांसाठी वॉरंटी कालावधीमध्‍ये दोन महिन्‍यांची वाढ दिलेली आहे.  

टॅग्स :Tataटाटाcorona virusकोरोना वायरस बातम्या