शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जलमय रस्त्यांवरच्या वाहनांची स्थितीही झाली पूरग्रस्तांसारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:00 IST

मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली.

ठळक मुद्देजलमय रस्त्यात आपली वाहने घालण्याऐवजी एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करायला हवे होते.जलमय मुंबापुरीच्या स्थितीमुळे ज्यांच्या कार बिघडल्या आहेत,त्यांना गॅरेजला न्यायला लागतील

मुंबईत मंगळवारी २९ ऑगस्टला जोरदार पावसामुळे सारे रस्ते, शहराचा सारा परिसर जलमय झाला. जणू महापुरासारखाच धक्का बसल्याने लोकांचे प्रचंड हाल झाले २००५ मधील २६ जुलैच्या महापुरासारखी आठवण अनेकांना झाली. रस्त्यावर तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलेले होते, काही ठिकाणी त्याहूनही जास्त पाणी होते. अनेक मोटारसायकल व स्कूटरचालक त्याही परिस्थितीत आपल्या वाहनांना पाण्यातून नेत होते.कमी ग्राऊंड क्लीअरन्स असणाऱ्या कार्सही या पाण्यामधून मार्गक्रमण करीत होत्या.वास्तविक रस्त्याचा अंदाज नसतानाही आपली वाहने अशा खोल पाण्यात घालण्याचे धाडस केले गेले, त्यात काही पारही झाले काही वाहने फसली. खरे म्हणजे अशा प्रकारच्या परिस्थितीत अतिशय गांभीर्याने विचार करून वाहन चालकांनी जलमय रस्त्यात आपली वाहने घालण्याऐवजी एकंदर स्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करायला हवे होते. किमान मोटारसायकल व स्कूटर्ससारख्या वाहनांनी वाहने अशा रस्त्यांमध्ये चालवायला नकोत.

ज्यांची वाहने जलमय रसत्यांवर उभी होती, त्यांची अपरिहार्यता एकवेळ समजू शकते. मात्र आता जलमय रस्त्यांमध्ये वाहने घातल्यानंतर ड्राईव्ह करताना करावी लागणारी कसरत, अनपेक्षित धोके आदी बाबींचा विचार करणे खरे म्हणजे प्रत्येक वाहन चालकाने ती मॅच्युरिटी दाखवायला हवी. असेच नव्हेत तर अन्य अशाच प्रकारच्या आपत्तींमध्ये आपली सुरक्षा व वाहनाचीही सुरक्षा ही महत्त्वाची असते, हे समजून घेणे गरजेचे असते. आता या जलमय मुंबापुरीच्या स्थितीमुळे ज्यांच्या कार बिघडल्या आहेत,त्यांना गॅरेजला न्यायला लागतीलच पण ज्यांनी जलमय रस्त्यातूनही रस्ता पार केला असेल, त्यांनाही आपली गाडी नीट तपासून, घ्यावी लागणार आहे. मोटारसायकलींची तर तीन फूट पाण्यात जाण्याने झालेली स्थिती नीट लक्षात घेऊन सारी यंत्रणा तपासून व साफसूफ करून घ्यावी लागणार यात शंका नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की आता या जलमय स्थितीमुळे झालेले नुकसान व संभाव्य नुकसान प्रत्येक वाहन चालक, मालकाने नीट समजून त्यावर नीट उपचार करायला हवेत.

स्थिती पूर्ववत झाल्यानंतर पहिली कामगिरी आता तीच करावी लागणार आहे. सर्व्हिसिंग, पूर्णपणे तपासणी, तेलपाणी सारे काही पाहावे लागणार आहे. एकंदर काय वाहनांची अवस्था तूर्तास तरी पूरग्रस्तांसारखी असणार आहे. त्यांना सावरण्यासाठी कामे करावी लागणार हे नक्की. शहरांमधील अनेकांची वाहने ही दैनंदिन वापरासाठी असणारी अत्यावश्यक साधनेच बनलेली आहेत. पण ती नीट व ठाकठीक असल्याची खात्री केल्याविना वापरू नयेत इतकेच.

 

टॅग्स :AutomobileवाहनMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार