शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:49 IST

China Rare Earth Metal: डोनाल्ड ट्रम्प हे खूप धूर्त निघाले आहेत. जगभरातील देशांवर टेरिफ लावण्याची धमकी देत ट्रम्प एकेका देशाकडून अमेरिकेच्या फायद्याची डील करत सुटले आहेत.

दुर्मिळ असलेल्या अर्थ मेटलची निर्यात रोखून चीनने जगाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामुळे ईव्हीसह इंधनावरील वाहनांची निर्मिती रोखण्याचा चीनचा प्रयत्न आहे. परंतू, ज्या रेअर अर्थ मेटलच्या जिवावर चीन एवढे डोळे वटारतोय ते मुळात चीन मलेशिया मधून आयात करतो आहे. जगाला चीन ते पुरवत असल्याने जगही चीनवरच विसंबून राहिले आहे. आता अचानक पुरवठाच बंद केल्याने भारतासह अनेक देशांच्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प हे खूप धूर्त निघाले आहेत. जगभरातील देशांवर टेरिफ लावण्याची धमकी देत ट्रम्प एकेका देशाकडून अमेरिकेच्या फायद्याची डील करत सुटले आहेत. सुरुवातीपासून ट्रम्प चीनवर डुख धरून टेरिफ लादत होते. तिकडे चीनने वाढविले की पुन्हा ट्रम्पही वाढवत होते. यानंतर ट्रम्पनी चिनी विद्यार्थ्यांना अमेरिकेतून हाकलण्याचा डाव टाकला तिथेच चीनसोबत रेअर अर्थ मेटलची डील पक्की केली. चीन अमेरिकेला रेअर अर्थ मेटल त्या बदल्यात देणार आहे. पण जगाचे काय...

चीनने रेअर अर्थ मेटलच्या निर्यातीच्या नियमात काही बदल केले आहेत. परंतू, यामुळे भारत, युरोप आणि अमेरिकेसह अनेक देशांची निर्यात थांबली होती. अमेरिकेला चीन हे मेटल देणार असले तरी भारतासोबतची निर्यात थांबलेलीच आहे. भारतीय कंपन्यांकडे साठा असलेले रेअर अर्थ मेटल आता जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यातच पुरले एवढे आहे. काही कंपन्यांनी ईव्ही गाड्यांचे उत्पादनही कमी केले आहे. याचा फटका उद्योगांना बसणार आहे. जरी हे मेटल दुसऱ्या मार्गाने मिळवायचे म्हटले तरी त्याला खूप वेळ लागणार आहे. 

या रेअर अर्थ मेटलमध्ये लॅन्थॅनम, निओडायमियम, प्रेसियोडायमियमसह एकूण १७ खनिजे समाविष्ट आहेत, जी इलेक्ट्रॉनिक, चुंबकीय आणि तांत्रिक उत्पादनांसाठी खूप महत्वाची आहेत.याच्या निर्यातीमध्ये चीनचा 92 वाटा आहे. हे मेटल टीव्ही, सौर पॅनेल, पवन टर्बाइन, इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन आणि लॅपटॉप बनवण्यासाठी वापरले जातात. यामुळे चीनच्या या आडमुठेपणामुळे उद्योग जगाचे चक्र थांबले जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी चीनच्या एकूण दुर्मिळ घटकांच्या आयातीपैकी म्यानमारचा वाटा सुमारे ५७% होता.

टॅग्स :chinaचीन