शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Mahindra, Tata नव्हे, ही कार कंपनी पुन्हा ठरली नंबर-1, लोकांनी सर्वाधिक खरेदी केल्या या कंपनीच्या कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 12:09 IST

सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही, लोक घरगुती वापरासाठी वाहने खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे 2022 मध्ये कारची विक्रमी विक्री होणे अपेक्षित आहे.

देशात कार खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे. या वर्षी कार उत्पादकांसाठी नोव्हेंबर हा आतापर्यंतचा सर्वोत चांगला महिना ठरला आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही, लोक घरगुती वापरासाठी वाहने खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे 2022 मध्ये कारची विक्रमी विक्री होणे अपेक्षित आहे. यातच, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि ह्युंदाई, या दिग्गज कंपन्यांनी, गेल्या महिन्यात आपल्या ठोक विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे म्हटले आहे. 

याशिवाय, Kia India, Honda Cars, Skoda आणि MG Motor या कार कंपन्यांनीही गेल्या महिन्यात जबरदस्त विक्री नोंदवली आहे. एवढेच नाही, तर प्रवासी वाहन उद्योगानेही नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंतची चांगली वाढ नोंदवली आहे. मात्र, टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि निसान या कंपन्यांनी नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची ठोक विक्री कमी झाल्याचे म्हटले आहे.

मारुती सुझुकीची विक्री -देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाच्या (MSI) ठोक विक्रीत नोव्हेंबर 2022 मध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात कंनीने 1,59,044 युनिटची विक्री केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये कंनीने डीलर्सना 1,39,184 वाहनांचा पुरवठा केला आहे. निवेदनात म्हणण्यात आले आहे, की या कालावधीत MSI ची देशांतर्गत विक्री 18 टक्क्यांनी वाढून ती 1,39,306 युनिट्स झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने 1,17,791 युनिट्सची विक्री केली होती.

ह्युंदाई मोटर इंडियाची विक्री-ह्युंदाईने म्हटल्यानुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये त्याच्या कारची ठोक विक्री 30 टक्क्यांनी वाढून 48,003 युनिट्स झाली आहे.  गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीच्या 37,001 युनिट्सची विक्री झाली होती. यातच, कंपनी 2022 मध्ये देशांतर्गत विक्रमी विक्री नोंदविण्यास तयार आहे, असे ह्युंदाई मोटर इंडियाचे संचालक (विक्री, विपणन आणि सेवा) तरुण गर्ग यांनी म्हटले आहे.

टाटा आणि महिंद्राची विक्री -गेल्या महिन्यात अर्थात नोव्हेंबर 2022 मध्ये टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांची ठोक विक्री 55 टक्क्यांनी वाढली असून ती 46,037 युनिट झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात हा आकडा 29,778 युनिट एवढा होता. याच बरबोर, महिंद्रा अँड महिंद्राची देशांतर्गत विक्री नोव्हेंबरमध्ये 56 टक्क्यांनी वाढून 30,392 युनिट्स झाली आहे.

टॅग्स :AutomobileवाहनMarutiमारुतीMahindraमहिंद्राHyundaiह्युंदाईTataटाटा