शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

तुमच्या गाडीचा विमा यंदा होणार महाग; प्रीमियममध्ये १५-२० टक्के वाढीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 5:50 AM

देशातील २५ विमा कंपन्यांनी विमा नियामक इर्डाला थर्ड पार्टी विम्याच्या प्रीमियममध्ये १५ ते २० टक्के वाढीचा प्रस्ताव दिला आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे दोन वर्षांपासून वाहन विम्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याने यंदा त्यामध्ये ५ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील २५ विमा कंपन्यांनी विमा नियामक इर्डाला थर्ड पार्टी विम्याच्या प्रीमियममध्ये १५ ते २० टक्के वाढीचा प्रस्ताव दिला आहे.कोरोना, वाहनांच्या विक्रीत घट आणि कमी प्रवास यामुळे वाहन विम्यांचे नुकसान झाले. बजाज अलियान्झ इन्शुरन्सचे मुख्य वितरण अधिकारी आदित्य शर्मा म्हणाले की, मोटार विमा उद्योगाला गेल्या आर्थिक वर्षात १.७ टक्के नुकसान झाले आहे. तथापि, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर कालावधीत, मोटार विम्यामध्ये ३.९ टक्के वाढ झाली आहे. मात्र कोरोनापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण अजूनही ५.१ टक्के कमी आहे.याशिवाय थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दावेही वाढले आहेत. त्यामुळे थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम वाढवण्यासाठी कंपन्यांवर दबाव आहे. इर्डानेही यावर्षी थर्ड पार्टी प्रीमियम वाढवण्याचे संकेत दिले आहेत. साधारणपणे मोटार इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये दरवर्षी वाढ होते, पण गेल्या दोन वर्षांपासून मोटार इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ झालेली नाही. प्रीमियम किती आणि कधी वाढणार हे अद्याप ठरलेले नाही. ही वाढ मार्चपर्यंत अपेक्षित आहे.व्यावसायिक वाहनांना फटकाइर्डा दरवर्षी क्लेम रेशोच्या आधारे थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर आणि प्रीमियमचा आढावा घेते. या आधारावर सामान्य विमा कंपन्या प्रीमियम वाढवण्याचा प्रस्ताव देऊ शकतात. त्यानुसार, प्रीमियम १० ते १५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक वाहनांवर अधिक परिणाम होणार आहे.