शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हायवेवर वेग घेताच थरथरू लागते तुमची कार? या खतरनाक संकेताकडे दुर्लक्ष नको...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:50 IST

तुम्ही जेव्हा तुमची कार हायवेवर घेऊन जाता तेव्हा एका गोष्टीकडे लक्ष द्या. जर तुमची कार व्हायब्रेट करू लागली किंवा थरथरू लागली तर तो धोक्याचा संकेत असतो.

हायवे म्हणजे कमी वेळेत जास्त अंतर तोडण्याचा मार्ग, त्याचबरोबर अपघातांचाही मार्ग असतो. हायवेवर पोहोचताच लोक गाडीचा वेग असा काही वाढवितात की, मागचा लागलेला वेळच नाही तर पुढचा वेळही कव्हर करतात. परंतू एक्स्प्रेस हायवेवरही वेगाची मर्यादा आहे. तरीही मनावर ताबा राहिला नाही तर बंद काचांमध्ये वेगाची नशा कळत नाही, आणि ही मर्यादा ओलांडली जाते. 

तुम्ही जेव्हा तुमची कार हायवेवर घेऊन जाता तेव्हा एका गोष्टीकडे लक्ष द्या. जर तुमची कार व्हायब्रेट करू लागली किंवा थरथरू लागली तर तो धोक्याचा संकेत असतो. कारचा वेग ६० किमीच्या वर गेला की ही कंपने जाणवू लागतात. असे का होते? रस्ता खडबडीत असतो मान्य पण त्यामागे गाडीतील एक कारणही आहे. ही समस्या दूरही करता येते. 

हे व्हायब्रेशन का जाणवते याचे कारण जाणणे गरजेचे आहे. जसा तुम्ही वेग ६० किमीच्यावर नेता तसा हे जाणवू लागते. पर्यावरण संरक्षण एजन्सीने यावर संशोधन केले आहे. सरासरी वाहनाचे वजन 1,885 किलोग्राम असते. परंतू जेव्हा ६० किमीच्या वेगाने कार धावू लागते तेव्हा ती गाडी 50,560 किलो ग्रॅमचा वेग निर्माण करते. यामुळे कारला नियंत्रित करणे अवघड होऊ लागते. यामुळे असंतुलित टायर, कर्ब प्रेशर, सस्पेंशन खराब होणे आणि तोल गमावणे या लक्षणांचा समावेश होतो. या कारणांमुळे गाडी जास्त बाऊन्स होऊ लागते. यामुळे आत बसलेल्या व्यक्तींना कंपने जाणवू लागतात. 

ही कंपने कमी करण्यासाठी काही उपाय करावे लागतील. जसे चाक फिरू लागले तसे टायर वळवळू लागतो. यामुळे आतून आणि बाहेरून दबाव वाढू लागतो. व्हील बॅलन्सिंगने ही समस्या दूर केली जाते. वाहनाची सर्व्हिसिंग करताना नेहमी ५००० किमी अंतरानंतर हे करणे गरजेचे असते. 

गाडीचे सस्पेंशनदेखील खराब झालेले असेल तर कंपने जाणवतात. गाडी स्मूथ चालण्यासाठी सस्पेंशनमध्ये शॉक अब्झॉर्बर आणि कॉईल स्प्रिंग दिलेली असते. काळानुसार त्याला गंज चढू लागतो. यामुळे या सस्पेंशनची नेहमी तपासणी करावी. याचबरोब कोणत्याही कारची व्हील बेअरिंग योग्य आकाराची असणे गरजेचे आहे. खराब रस्त्यांवर जास्त वाहन चालत असेल तर व्हील बेअरिंगवर दबाव पडून ती लवकर खराब होते. यामुळे झटके बसणे सुरु होते. 

टॅग्स :carकारhighwayमहामार्ग