कारमध्येही स्वच्छता हवीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 05:34 PM2017-08-15T17:34:34+5:302017-08-15T17:35:19+5:30

शहराप्रमाणेच आपली कारही स्वच्छ ठेवा, मात्र त्यासाठी आपल्या कारमधील कचरा प्रवासामध्ये रस्त्यावर नको, तर कारमध्ये एका पिशवीत जमा करून मग तो कचरापेटीतच टाका.

The car also needs cleanliness | कारमध्येही स्वच्छता हवीच

कारमध्येही स्वच्छता हवीच

Next

स्वच्छतेचा संदेश सरकार, प्रशासन नेहमीच देत असोत. पण या संदेशाला केवळ कागदावरील वा सोशल मिडियावरील दृश्यतेपुरते मर्यादीत ठेवू नका. घराघरामध्ये वा वस्त्यांमध्ये त्यासाठी जशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला जातो, तशीच काळजी कार, दुचाकी व अन्य वाहने वापरतानाही घ्या. वाहनातून जाताना कारमध्ये कचरा नको म्हणून बाहेर फेकला जातो, का तर कार स्वच्छ राहायला हवी, असा उद्देश असतो, पण असे करणे अतिशय चुकीचे आहे. तुमची कार वा स्कूटर, किंवा अन्य वाहन  यामधून रस्त्यावरून प्रवास करताना त्यातून काही कचरा बाहेर फेकणे अयोग्यच आहे. तुमच्या वाहनात कचरा नको म्हणून तुम्ही रस्त्यावर कचरा करणे बरोबर नाही. त्यासाठी तुम्ही कारमध्ये कचऱ्यासाठी पिशव्या ठेवा. त्यात कचरा टाकून मग तो कचरापेटीमध्ये टाका. हा संदेश केवळ रस्त्यावरच्या स्वच्छतेसाठी नाही तर तो कारच्या वा तुमच्या वाहनाच्या स्वच्छतेसाठीही आहे. हात साफ करण्यासाठी एक टॉवेलही बरोबर असद्यावा. किंवा पेपर नॅपकिन्लही असतील तरी चांगले पण त्यामुळे कचरा बाहेर टाकू नका व कारमध्येही टाकू नका.

सर्वसाधारणपणे प्रवासाला सहकुटुंब बाहेर पडल्यानंतर अनेकवेळा लहान मुलांना वेफर्स, पॉपकॉर्न, शीतपेयांचे टेट्रापॅक, बर्गर, पिझ्जा आदी बाबीही कौतुकाने दिल्या जातात. पण यामुळे तयार होणारा सुका व ओला कचरा तुम्हाला तुमच्या कारमध्ये नको असतो. तुम्हाला तुमची कार स्वच्छ हवी असते. ते चूकही नाही. पण मुळात असा कचरा अवावश्यक प्रमाणआत न होऊ देणे तुमच्या हाती आहेे. तरीही अपरिहार्यपणे तो होणार असेल तर त्यासा कचऱ्याला एका पिशवीमध्ये साठवा. मागच्या व पुढच्या सीटसाठी स्वतंत्र पिशव्या कचरा जमा करण्यासाठी ठेवा. वर्तमानपत्राची रद्दी त्याचीही स्टेपल मारून वा टेपने चिकटवून पिशवी तयार करू शकालय यामध्येच गाडीत बसणाऱ्यांना कचरा टाकायला सांगा. मुळात लहान मुलांकडून अशा प्रकारच्या खाद्यववस्तुंची मागणी होते व लांबच्या प्रवासात प्रत्येकवेळी कार कुठे थांबवणे शक्यही नसते. काहीवेळा घरूनच काही पदार्थ तयार करून नेले जातात. अशामुळे गाडीमधील वातावरण काहीसे अस्वच्छ होऊ शकते. वातानुकूलन यंत्रणा चालू असेल तर काहीवेळा खाद्यपदार्थांचा वास तसाच कारमध्ये रेंगाळत राहातो. आणि अशाबरोबर कचराही सीटवर, फ्लोअरिंगवर, डॅशबोर्डवर वा मागील पार्सल ट्रेवरही टाकला जाऊ शकतो. प्रवासातून परतल्यावर कार सफाईच्यावेळी पाहू, असा विचार करून काही लोक आवर्जून गाडी खराब करतात तशा वातावरणात प्रवासही पूर्ण करतात. प्रवासामध्ये कारमधील हवा, वातावरण फ्रेश, ताजे व सुगंधित ठेवा. त्यामुळे चालकालाही व प्रवाशांनाही ते आवडेल. प्रवासाचा आनंद कारममध्ये कारण नसताना कचरा करून बसण्याची गरज नाही. सिगरेटही मोटारीमध्ये ओढू नका. कार चालवताना चालवणाऱ्याने तर असले प्रकारही करू नयेत. वाऱ्यामुळे सिगरेटची ठिणगी सीटवर पडली तर त्यामध्ये सीटही जळू शकते.  तुमची कार जितकीस्वच्छ राहील तितकेच तुमचे कामही कमी असेल. काहीवेळा शीतपेये सीटवर सांडली जातात व त्यामुळे तेथे चिकटपणा राहाणे, दुर्गंधी पसरणे, त्यावर धूळही चिकटणेअसे प्रकार होऊ शकतात. यासाठी कारमध्ये शक्यतो खाद्यपदार्थ खाताना काळजी घ्या व त्याचा कचरा एका पिशवीत आठवणीने टाकून मग ती पिशवी कचरापेटीत टाका, रस्त्यावर फेकू नका. स्वच्छतेचा धडा आपल्यापासूनच सुरू करायचा असतो, तो या कारच्यानिमित्ताने होत असेल तर चांगलेच आहे की...

Web Title: The car also needs cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.