शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१ जूनपूर्वी इलेक्ट्रीक बाईक खरेदी करा अन् २५ हजार वाचवा; उरले केवळ ८ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 13:08 IST

इलेक्ट्रिक अँड हायब्रिड व्हेईकल्स (FAME) इंडिया योजना १ एप्रिल २०१९ रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी सुरू झाली होती, जी आणखी दोन वर्षांच्या कालावधीसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती.

नवी दिल्ली - देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन दिले जाते. महागड्या डिझेल-पेट्रोलमुळे ग्राहकांचाही कल इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार उत्पादक कंपन्यांना सबसिडी देते, ज्यामुळे ग्राहकांना थोड्या कमी किमतीत वाहन मिळते. परंतु, १ जून २०२३ पासून केंद्र सरकारने इलेक्ट्रिक टू व्हीलर सबसिडीला दिले जाणारे अनुदान कमी करण्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने FAME-II (फास्टर एडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया) योजनेंतर्गत १ जून २०२३ रोजी किंवा त्यानंतर नोंदणी केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना लागू असलेले अनुदान कमी केले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने या बदलाबाबत अधिसूचना जारी केली आहे, ज्या अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी मागणी प्रोत्साहन म्हणून दिले जाणारे अनुदान १५००० रुपये प्रति किलोवॅट तासावरून  १०००० रुपये प्रति किलोवॅट तास करण्यात आले आहे.

अलीकडेच, केंद्र सरकारने इलेक्ट्रिक दुचाकींसाठी प्रोत्साहन मर्यादा ४० टक्क्यांवरून एक्स-फॅक्टरी किमतीच्या १५ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. इलेक्ट्रिक अँड हायब्रिड व्हेईकल्स (FAME) इंडिया योजना १ एप्रिल २०१९ रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी सुरू झाली होती, जी आणखी दोन वर्षांच्या कालावधीसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती. याचा फायदा इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना होत होता, मात्र आता अनुदान कमी झाल्याचा बोजा थेट ग्राहकांच्या खिशावर पडताना दिसत आहे. दुचाकीची किंमत २५ ते ३५ हजार रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर खरेदी करून पैसे वाचवातुम्ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्कूटर किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही १ जून २०२३ पूर्वी खरेदी करावी. याच्या मदतीने तुम्ही खूप पैसे वाचवू शकता, कारण १ जूननंतर इलेक्ट्रिक दुचाकींच्या किमती वाढतील. कारण सबसिडी कमी केल्याने वाहन उत्पादक ग्राहकांकडून ती किंमत वसूल करतील, जी आतापर्यंत सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळत होती. अहवालानुसार, १ जूनपूर्वी दुचाकी खरेदी केल्यास ग्राहक अंदाजे २५००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरCentral Governmentकेंद्र सरकार