शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींच्या लक्झरी कलेक्शनमध्ये सामील झाली नवी SUV, अमेरिकन राष्ट्रपतींकडेही आहे ही आलिशान कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 12:50 IST

कॅडिलॅक भारतात त्यांची वाहने विकत नाही. याचा अर्थ मुकेश अंबानी यांनी ही एसयूव्ही आयात केली आहे.

नवी दिल्ली - मुकेश अंबानी हे प्रचंड संपत्तीचे धनी आहेत. याशिवाय त्यांच्याकडे आलिशान कार कलेक्शनही आहे.  त्यांना गाड्यांची प्रचंड आवड आहे आणि आता त्यांनी अशीच एक अलिशान SUV खरेदी केली आहे. आधिपासूनच असलेल्या लक्झरीअस कारच्या ताफ्यांत मुकेश अंबानी यांनी आता कॅडिलॅक एस्केलेड (Cadillac Escalade) SUV ही सामील केली आहे. सध्या या SUVचा केवळ एक फोटो इंटरनेटवर दिसला आहे. तो कार क्रेझी इंडिया नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

कॅडिलॅक भारतात आपली वाहने विकत नाही - अंबानींची ही कॅडिलॅक एस्केलेड सिल्व्हर कलर फिनिशमध्ये आली आहे. खरे तर कॅडिलॅक भारतात त्यांची वाहने विकत नाही. याचा अर्थ मुकेश अंबानी यांनी ही एसयूव्ही आयात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शानदार दिसणार्‍या SUV मध्ये एस्केलेडचाही समावेश आहे. या कारची साईज, डिझाइन आणि जबरदस्त अंदाज पाहणाऱ्यांना अक्षरशः दीपून टाकतो. मोठ्या आकाराची ग्रिल ते एलईडी हेडलँप्सपर्यंत या कारमध्ये सर्वकाही आलीशान आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडेही आहे कॅडिलॅक एस्केलेड -हॉलीवूडमधीलही अनेक सुपरस्टार ही एसयूव्ही वापरतात. एवढेच नाही, तर अमेरिकेचे राष्ट्रपती देखील कॅडिलॅक एस्केलेडचा वापर करतात. भारतात ही SUV केवळ मुकेश अंबानींकडेच आहे, असे नाही, तर इतरही काही लोकांकडे आहे. आकाराने प्रशस्त असल्याने या कारला इंजिनही तेवढेच तगडे देण्यात आले आहे. Escalade मध्ये 6.2-लीटर V8 इंजिन आहे, जे 420 Bhp आणि 624 Nm पीक टॉर्क तयार करते.

मुकेश अंबानींचे लक्झरी कार कलेक्शन -मुकेश अंबानींच्या गॅरेजमध्ये या नव्या SUV शिवाय, लँड रोव्हर डिफँडर 110, लॅक्सस एलएक्स-570, बेंटले बेंटायगा डब्ल्यू12, बेंटले बेंटायगा व्ही-8, रोल्स रॉयल कलिनन, लँड रोव्हर रेंज रोवर, लॅम्बोर्गिनी उरुस, मर्सिडीज-बेंझ एएमजी जी-63, लँड रोव्हर डिस्कव्हरी आणि अशा इतरही कारचा समावेश आहे. मुकेश अंबानींच्या या जबरदस्त लक्झरी कार कलेक्शनमध्ये जगातील अत्यंत महागड्या आणि शानदार कार्सचा समावेश आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीcarकारRelianceरिलायन्स