शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:19 IST

Royal Enfield Flying Flea C6 भारतात लाँच. BaaS पर्यायासह किंमत १.९९ लाख. १५४ किमी रेंज आणि प्रगत फीचर्ससह रॉयल एनफील्डची पहिली EV.

बुलेट प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. दिग्गज दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली सी६' अधिकृतपणे लाँच केली आहे. आकर्षक रेट्रो लूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या या बाईकने ऑटो मार्केटमध्ये खळबळ माजवून दिली आहे.

काय आहे 'Flying Flea C6' ची किंमत?रॉयल एनफील्डने आपल्या या पहिल्या इलेक्ट्रिक अवताराची सुरुवातीची किंमत १.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ही एक स्पर्धात्मक किंमत मानली जात आहे, ज्यामुळे सामान्य ग्राहकांनाही प्रीमियम इलेक्ट्रिक बाईकचा अनुभव घेता येईल. तसे पहायला गेल्यास 'Flying Flea C6' ची एक्स-शोरूम किंमत २.७९ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

वेग आणि बॅटरी क्षमताबॅटरी: या बाईकमध्ये ३.९१ kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

रेंज: एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक १५४ किमी (IDC) पर्यंत धावू शकते.

वेग: ही बाईक केवळ ३.७ सेकंदात ० ते ६० किमीचा वेग पकडते, तर याचा टॉप स्पीड ११५ किमी प्रति तास आहे.

चार्जिंग: हाय-स्पीड चार्जरच्या मदतीने बॅटरी २०% वरून ८०% पर्यंत केवळ ६५ मिनिटांत चार्ज होऊ शकते.

विशिष्ट डिझाइन आणि फिचर्सया बाईकचे डिझाइन दुसऱ्या महायुद्धातील मूळ 'Flying Flea' वर आधारित आहे. यात अल्युमिनियम फोर्ज्ड गर्डर फोर्क्स आणि मॅग्नेशियम बॅटरी केसिंग देण्यात आले आहे. तसेच, सुरक्षेसाठी कॉर्नरिंग ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे प्रीमियम फिचर्सही समाविष्ट करण्यात आले आहेत.

रॉयल एनफील्डची सर्वात 'लाईट' बाईकया बाईकचे डिझाइन जुन्या 'फ्लाइंग फ्ली'पासून प्रेरित आहे. वजनाच्या बाबतीत ही रॉयल एनफील्डची आतापर्यंतची सर्वात हलकी बाईक ठरली आहे. बॅटरीसाठी खास अ‍ॅल्युमिनियम बॉक्स वापरल्यामुळे आणि इतर हलक्या धातूंच्या वापरामुळे या बाईकचे वजन फक्त १२४ किलो आहे.

अत्याधुनिक फीचर्सडिजिटल डिस्प्ले: गुगल नेव्हिगेशन सपोर्टसह स्मार्ट कन्सोल.

कनेक्टिव्हिटी: वायरलेस फोन चार्जिंगची सुविधा.

सुरक्षा: कॉर्नरिंग ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे प्रगत सुरक्षा फीचर्स.

राइडिंग मोड्स: यात 'स्पोर्ट' आणि 'इंडिविज्युअल' असे दोन मोड्स दिले आहेत. इंडिविज्युअल मोडमध्ये रायडर आपल्या आवडीनुसार बाईकची पॉवर आणि ब्रेकिंग सेट करू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Royal Enfield Launches 'Flying Flea C6' Electric Bike: Details & Price

Web Summary : Royal Enfield debuts 'Flying Flea C6', its first electric bike, priced at ₹1.99 lakh. It boasts 154km range, 115kmph top speed, retro design, advanced features and lightweight build, weighing only 124 kg.
टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर