शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

MG Astor SUV ची बुकिंग पुढच्या वर्षीपर्यंत फुल; आता 2022 मध्येच मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 17:38 IST

MG Astor booking started: MG Motors ने अ‍ॅस्टरला 9,78,000 रुपये एक्स शोरुम या किंमतीमध्ये आणले आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 16,78,000 रुपये आहे.

एमजी मोटार इंडियाने MG Astor SUV साठी आज बुकिंग सुरु केले होते. परंतू अवघ्या काही मिनिटांतच सगळ्या कारची विक्री झाली आहे. या कारची डिलिव्हरी 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार असून पुढील वर्षीचे बुकिंग सुरु असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 

कंपनी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये फक्त 5000 एमजी अ‍ॅस्टर विकणार आहे. ही बुकिंग फुल झाली आहे. ग्राहकांना २०२२ या वर्षासाठी अ‍ॅस्टरची बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच अधिकृत एमजी शोरूममध्ये जाऊनही करता येणार आहे. ही भारताची पहिली पर्सनल एआय असिस्टंट आणि आपल्या सेग्मेंटमधली पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-२) टेक्नॉलॉजी असलेली मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. 

एमजी मोटार इंडियाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले की, जगभरातील वाहन उद्योग चिपच्या तुटवड्याला सामोरा जात आहे. यामुळे आम्ही यंदा मोजक्या संख्येनेच कारचा पुरवठा करू शकू. येत्या वर्षातील पहिल्या तिमाहीपासून पुरवठा सुरळीत होण्याची आम्हाला आशा आहे.

MG Motors ने अ‍ॅस्टरला 9,78,000 रुपये एक्स शोरुम या किंमतीमध्ये आणले आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 16,78,000 रुपये आहे. MG Astor ही Hyundai Creta आणि Kia Seltos ला थेट टक्कर देणार आहे. मारुतीची ब्रेझा जरी या रेंजमध्ये असली तरी देखील फिचर्सच्या तुलनेत ती खूप मागे आहे. MG Astor मध्ये जो एआय रोबोट असेल त्याचा आवाज पॅरालंपीक अ‍ॅथलिट दीपा मलिक (Deepa Malik) चा असणार आहे. हा रोबोट कारला कनेक्टेड फिचर्सशी संबंधीत अनेक काम करणार आहे. याद्वारे तुम्ही कार अनलॉक, लॉक करण्याचे काम करेल. गाडीमध्ये एकूण 27 स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स आणि 49 अन्य सेफ्टी फिचर्स व्हेरिअंटनुसार देण्यात आले आहेत.

संबंधीत वृत्त...MG Astor Price: दीपा मलिकचा आवाज, देशातील पहिली रोबोट कार; MG Astor ची किंमत जाहीर

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्स