शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोईंगची केवळ विमानेच नाहीत...तर हवेत उडणारी टॅक्सीही आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 10:52 IST

जगभरातील स्टार्टअपपासून अनेक कंपन्या फ्लाईंग टॅक्सी आणण्याच्या प्रयत्नात आहेत.

प्रवासी आणि मालवाहू विमान निर्माता कंपनी बोईंगने तिच्या पहिल्या अ‍ॅटोमॅटीक फ्लाईंग टॅक्सीची यशस्वी चाचणी घेतली. VTOL असे या टॅक्सीचे नाव असून टेक ऑफ, हवेत उडण्यास आणि लँडिंग करण्यासा ही टॅक्सी सक्षम असल्याचे म्हटले आहे. 

जगभरातील स्टार्टअपपासून अनेक कंपन्या फ्लाईंग टॅक्सी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. याच्या बातम्याही वेळोवेळी येत असतात. मात्र, बोईंगने त्यांना मागे टाकत फ्लाईंग टॅक्सी प्रत्यक्षात आणली आहे. 

या हवाई टॅक्सीचा वापर शहरी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेथे वाहतूक कोंडीमुळे उपनगरांमध्ये जाणे कठीण बनले आहे. तसेच पर्यावरणाचीही हानी होणार नाही. ही हवाई टॅक्सी वापरल्याने अन्य लोकांनाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

कंपनी या हवाई टॅक्सीला मालवाहू टॅक्सीच्या दृष्टीनेही वापरण्याचा विचार करत आहे. जे 230 किलो वजन पेलू शकणार आहे. मात्र, कंपनीसमोर या टॅक्सीसाठी ग्राहकवर्ग मिळविण्याचे आव्हान आहे. याशिवाय शहरांमध्ये ही टॅक्सी उडविताना अनेक समस्या येणार आहेत. तसेच सरकारी नियमही अडकाठी आणणार आहेत. कारण जरी ही टॅक्सी हेलिकॉप्टरपेक्षा छोटी असली तरीही देशांच्या हवाई खात्याच्या नियमांमध्ये राहूनच उड्डाण आणि उतरवावे लागणार आहे. 

टॅग्स :airplaneविमान